• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
अणुऊर्जा विभाग

प्रोफेसर सविता लाडगे ठरल्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या नायहोम पारितोषिकाच्या मानकरी

Posted On: 13 DEC 2023 5:25PM by PIB Mumbai

मुंबई, 13 डिसेंबर 2023

 

रसायनशास्त्राच्या शिक्षणात दिलेल्या योगदानाबद्दल मुंबईच्या प्रोफेसर सविता लाडगे या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या नायहोम शिक्षण पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या प्रोफेसर लाडगे यांना भारतात रसायनशास्त्राच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी रसायनशास्त्राच्या शिक्षकांना मार्गदर्शन आणि शिक्षक आणि विद्यार्थी कार्यक्रम सुरू करून रसायनशास्त्र शिक्षणाच्या महत्त्वाचा अतिशय उत्साहाने पुरस्कार केल्याबद्दल हे पारितोषिक मिळाले आहे.

हे पारितोषिक मिळवणाऱ्या सर्व विजेत्यांचा आरएससीच्या यापूर्वीच्या विजेत्यांच्या प्रतिष्ठेच्या यादीत समावेश केला जातो, ज्यापैकी 60 जणांनी पुढे जाऊन त्यांच्या कार्याबद्दल नोबेल पारितोषिकही मिळवले आहे. यामध्ये 2022 च्या नोबेल पारितोषिक विजेत्या कॅरोलिन बर्टोझी आणि 2019 चे नोबेल पारितोषिक विजेते जॉन बी. गुडइनफ यांचा समावेश आहे. प्रोफेसर लाडगे यांना या पारितोषिकाच्या स्वरुपात 5000 पौंड, एक पदक आणि प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

हे पारितोषिक प्राप्त केल्यावर प्रोफेसर लाडगे म्हणाल्या, “हे पारितोषिक मिळाल्याबद्दल मला खूप मोठा बहुमान  आणि रसायनशास्त्र शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या समुदायात मान्यता मिळाल्यासारखे वाटत आहे.  याबद्दल मी आरएससी ची आभारी आहे. हा पुरस्कार आणि मान्यतेमुळे मला माझे काम अधिक जास्त आवडीने आणि उत्साहाने पुढे सुरू ठेवण्यासाठी आणखी जास्त प्रेरणा मिळाली आहे. रसायनशास्त्र शिक्षणाविषयी सामान्यतः मला खूपच जास्त जिव्हाळा आहे.”

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या मुख्य कार्यकारी डॉ. हेलेन पेन म्हणाल्या, “प्रोफेसर लाडगे यांचे कार्य रसायनशास्त्र शिक्षणाविषयीची  उल्लेखनीय वचनबद्धता प्रदर्शित करत आहे आणि त्यांच्या या लक्षणीय योगदानाचा सन्मान करणे हा आमचा देखील बहुमान आहे.”

शिक्षणातील उत्कृष्टतेची पारितोषिके प्राथमिक, माध्यमिक आणि त्यापुढील शिक्षण आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, तंत्रज्ञ आणि इतरांसह प्रेरणादायी, नवोन्मेषी आणि समर्पित लोकांचा सन्मान करतात. 

अभ्यासक्रमाच्या रचनेपासून ते प्रभावी अध्यापन आणि वैयक्तिक विकासापासून ते कार्य संस्कृतीपर्यंत विविध प्रकारच्या कौशल्यांचा ही पारितोषिक बहुमान करतात. या श्रेणीत आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्यांचा आणि संघांच्या पारितोषिकांचा समावेश आहे.

आरएससीच्या पारितोषिकांच्या पोर्टफोलियोविषयी अधिक माहितीसाठी  rsc.li/prizes. येथे भेट द्या.

द रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीची पारितोषिके ही जगातील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक प्रतिष्ठेच्या पारितोषिकांपैकी एक आहेत, ज्यांच्या माध्यमातून रासायनिक विज्ञानाच्या क्षेत्राला पुढे नेणाऱ्या व्यक्ती, संघ आणि संघटनांचा गौरव करण्यात येतो.

rsc.li/prizes या ठिकाणी अधिक माहिती उपलब्ध आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1985919) Visitor Counter : 82

Read this release in: English

Link mygov.in