माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे रत्नागिरीमध्ये शिवाजी स्टेडीअम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रोटोकॉलचे आयोजन
Posted On:
19 JUN 2023 5:22PM by PIB Mumbai
रत्नागिरी, 19 जून 2023
21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी स्टेडीमच्या बॅडमिंटन हॉल येथे केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग प्रात्यक्षिके, योग आधारित मार्गदर्शन आणि योग विषयक स्पर्धांचे बक्षीस वितरण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी स्टेडीअम, बॅडमिंटन कोर्ट येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या निमित्ताने होणाऱ्या योग प्रात्यक्षिकांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपणा सर्वांच्या आरोग्याची गुरुकिल्ली असलेल्या योग सरावाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे जो जगभरात योगाच्या सरावाला आणि फायद्यांना प्रोत्साहन देतो. या वर्षीचा उत्सव विशेष उल्लेखनीय असून संयुक्त राष्ट्र मुख्यालय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या सहभागाने आणखी खास बनेल. “उत्तम आरोग्य आणि निरोगीपणासाठी योग जगाला एकत्र आणत असून जागतिक स्तरावर योग अधिकाधिक लोकप्रिय होत राहो.” असा संदेश पंतप्रधानांनी सर्वांना दिला आहे.
योग, त्याच्या एकता आणि परस्परांशी जोडले जाण्याच्या मूलभूत तत्त्वांसह, "वसुधैव कुटुंबकम" या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे. योगाच्या सरावाद्वारे, व्यक्ती इतरांशी आणि जगाशी असलेले त्यांचे संबंध ओळखून त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करतात. योग सर्व प्राणी आणि पर्यावरणाप्रती सहानुभूती, करुणा आणि जबाबदारीची भावना प्रोत्साहित करतो. त्यामुळे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची योग फॉर वसुधैव कुटुंबकम अशी संकल्पना आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे वसुधैव कुटुंबकमची तत्त्वे स्वीकारण्याची आणि जागतिक सलोख्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.
* * *
PIB Mumbai | CBC Kolhapur | MC/PK/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1933430)
Visitor Counter : 24