सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन आवर्जुन पहावे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचा उपक्रम
Posted On:
04 OCT 2022 5:33PM by PIB Mumbai
नागपूर, 4 ऑक्टोबर 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन आवर्जुन पहावे. यासाठी अनुयायांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन या प्रदर्शनाला भेट देऊन बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज केले.
66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 ऑक्टोबर 2022 रोजी ड्रॅगन पॅलेस कामठी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृातिक व संशोधन केंद्र येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारीत ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’’ हे मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा आणि माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखाताई कुंभारे, वाहतूक शाखेचे नागपूर पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे प्रभारी सहायक संचालक तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रदर्शनीची पाहणी देखील केली. दीक्षाभूमी नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक सुंदर स्मारक ऍड. सुरेखाताई कुंभारे यांनी कामठी येथे स्थापन केले असून याला भेट देण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मील येथील स्मारक देखील एक ते दोन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय संचार ब्युरो नागपुर तर्फे आयोजित प्रदर्शन आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत पाहण्यासाठी निःशुल्क सुरू राहणार आहे. या मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनात डॉ, बाबासाहेब आंबेडकराचे शैक्षणिक कार्य, संविधान निर्मितीमधील योगदान, धम्मदीक्षेचा सोहळा आणि त्यांचे कौटुंबिक ,राजकीय प्रसंग प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. या प्रदर्शनात चित्रपट विभागाद्वारे निर्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकरावरील १७ मिनिटांचा माहिती पट दाखवण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागातर्फे ग्रंथविक्रीही सवलतीच्या दरात सुरू आहे.
दरम्यान कामठी येथील ओगावा सोसायटीच्या वतीन ४ आणि ५ ऑक्टोबर २०२२ रोजी ड्रॅगन पॅलेस टेम्पल , कामठी येथे दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. आज या महोत्सवाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी धम्मचक्र महोत्सव मुख्य समारंभाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
* * *
PIB Nagpur | D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865122)
Visitor Counter : 95