• Skip to Content
 • Sitemap
 • Advance Search
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

बीएसएनएल, गोवा विभागाच्या सक्रीयतेमुळे टाळेबंदीतही अखंड ‘कनेक्टिव्हिटी’


टाळेबंदीच्या काळात ब्रॉडबँड व मोबाइल डेटा वापरामध्ये अनुक्रमे तब्बल 31% व 24% वाढ

Posted On: 31 MAY 2020 2:48PM by PIB Mumbai

पणजी, 31 मे 2020


टाळेबंदीच्या काळात टेलिफोन व इंटरनेट सेवा ही नागरिकांना बाहेरील जगाशी जोडून ठेवणारी नाळ बनली आहे. टाळेबंदीच्या काळात व्यावसायिक असो वा करमणूक या दोन्ही गरजांसाठी ऑनलाईन सेवांची मागणी गगनाला भिडली. राज्यातील भारत संचार निगम मर्यादित अर्थात ‘बीएसएनएल’ने या सेवेचा कणा म्हणून पुन्हा एकदा आपली भूमिका पार पाडली.

भारत सरकारचा उपक्रम असलेले ‘बीएसएनएल’चे पाटो, पणजी येथील मुख्यालय 144 टेलिफोन एक्सचेंज, 11 ग्राहक सेवा केंद्रे, मोबाइल बेस ट्रान्सीव्हर स्टेशन इत्यादीचे परिपूर्ण टेलिकॉम नेटवर्क चालवत आहे तसेच देखरेख करत आहे. ‘बीएसएनएल’चे ‘ऑप्टिकल फायबर’ / भूमिगत केबल नेटवर्क राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे, ज्यामुळे लँडलाईन टेलिफोन, ब्रॉडबँड इंटरनेट, लीज्ड / डेटा सेवा, ‘फायबर टू द होम’ (एफटीटीएच), मोबाइल सेवा इत्यादी सर्व सेवा समाजातील सर्व घटकांना प्रदान केल्या जातात. गोवा राज्यातील कोविड-19 टाळेबंदी दरम्यान ‘बीएसएनएल’, गोव्याने पुढाकाराने केलेल्या काही गोष्टी खाली दिल्या आहेत. 

 • उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांना विशेष हेल्पलाईन पुरविल्या गेल्या.
  • खाद्य हेल्पलाईन: 9423890077 (उत्तर गोवा) 9423890066 (दक्षिण गोवा)
  • आपत्ती व्यवस्थापन: 9423702575 (उत्तर गोवा) 9423702675 (दक्षिण गोवा)
 • ‘बीएसएनएल’ गोवा राज्याची जीवनरेषा आहे, तसेच संपूर्ण बँकिंग क्षेत्र ‘बीएसएनएल टेलिकॉम नेटवर्क’वर कार्यरत आहे, हे पाहता बँकिंग क्षेत्राला पुरविलेल्या नेटवर्कची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत.
 • सर्व प्रकारच्या विषयांशी संबंधित सुविधा लोकांना मिळाव्यात यासाठी ‘बीएसएनएल’ कार्यालये व ग्राहक सेवा केंद्रे पूर्णपणे कार्यरत करण्यात आली; ज्यायोगे ग्राहकांची गैरसोय टाळता येईल.
 • 24 तास देखभाल व देखरेख करत राजभवन, मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस मुख्यालय व पोलिस ठाणे, रुग्णालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग इत्यादींना अत्यावश्यक टेलिकॉम सेवा पुरविण्यात आल्या. 
 • सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून ‘ब्रेक-डाऊन’ / इतर समस्यांचा सामना करण्यासाठी 24 तास देखभाल गट तयार करण्यात आला. टेलिकॉम सेवेची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीतही समस्यांचे निराकरण केले गेले. 


पंचवाडी येथे ऑप्टिकल फायबर केबलची दुरुस्ती

 • घरून काम करणे, या कार्यपद्धतीला सुलभ करण्यासाठी, ‘बीएसएनएल’ने ‘वर्क अॅट होम’ योजना सुरू केली; ज्याद्वारे ‘बीएसएनएल ब्रॉडबँड’ वापरकर्त्यांना विनामूल्य इंटरनेट दिले गेले. सेवा सुरू केल्यापासून एका महिन्यासाठी 10 एमबीपीएस पर्यंतच्या वेगासह 5 जीबी डेटा दिला गेला. ही योजना नवीन तसेच जुन्या बीएसएनएल ग्राहकांना विनामुल्य लागू आहे. या सेवेच्या जोडणीसाठी किंवा सुरक्षा शुल्क म्हणून कोणताही अतिरिक्त खर्च नाही.
 • व्यवसायांना आधार म्हणून, बीएसएनएल उपक्रम व किरकोळ ग्राहकांना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या संपर्कात राहण्यासाठी ‘बीएसएनएल क्लाउड’ आधारित ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशन’ विनामूल्य दिले गेले. कोविड-19 साथीच्या काळात मनोरंजनाची गरज भागविण्यासाठी बीएसएनएलने भारत फाइबर ब्रॉडबँड व हॉटस्टार यांना एकत्रित आणले. समाजातील सर्व घटकांच्या सोयीसाठी, विशेषत: गोव्याच्या एकूण लोकसंख्येच्या 17% असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी, बिल देयकाची मुदत वाढविण्यात आली आहे. 
 • या टाळेबंदीच्या काळात ब्रॉडबँड व मोबाइल डेटा वापरामध्ये अनुक्रमे तब्बल 31% व 24% वाढ झाली आहे.

याशिवाय राज्य व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 ला रोखण्यासाठी सर्व बीएसएनएल कार्यालयांमध्ये सेनिटायझर्स, मास्क, स्वच्छता अशा सर्व खबरदारीच्या उपाययोजना पाळल्या जात आहेत. सुरक्षित अंतराचे नियम पाळत, ग्राहकांना सामोरे जाताना येणाऱ्या आव्हानांशी कसे तोंड द्यावे, याबाबत कर्मचार्‍यांशी संवाद साधण्यात आला आहे. मर्यादित वाहतूक सुविधांमुळे कर्मचारी व सामग्रीची ने-आण करण्यात समस्या येत असून देखील सर्व बीएसएनएल कार्यालये टाळेबंदीच्या काळात पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पूर्णपणे कार्यरत आहेत. टाळेबंदी काळात दैनंदिन कामकाजात बीएसएनएल सर्व राज्य, केंद्र सरकारच्या विभागांशी व इतर संस्थांशी योग्य समन्वयाने काम करत आहे.

* * *

PIB Goa/RT/DR

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1628118) Visitor Counter : 130

Read this release in: English

Link mygov.in