• Sitemap
  • Advance Search
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

खतनिर्मिती संयंत्र पुनरुज्जीवन आणि पूर्व भारत, नॅशनल गॅस ग्रिड आणि पाईपलाईनसाठी 50,000 कोटी रुपये गुंतवणार

Posted On: 27 APR 2017 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 एप्रिल 2017

 

रसायन आणि खत मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या आणि बंद पडलेल्या खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवनासाठी खत आणि रसायन मंत्री अनंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत आज नवी दिल्लीत एक बैठक झाली. पूर्व भारताच्या जलद विकासासाठी कृषी आधारीत पायाभूत क्षेत्रातल्या गुंतवणुकीमुळे या भागात दुसऱ्या हरितक्रांतीला चालना मिळेल. बंद पडलेल्या खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि नॅशनल गॅस ग्रिडशी पूर्व भारत जोडण्याकरीता गॅस पाईपलाईन जाळे उभारण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे प्रधान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1488789) अभ्यागत कक्ष : 22