57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

अर्जेंटिनाच्या ‘द रिव्हर ट्रेन’ चित्रपटाला रौप्य मयूर - विशेष ज्युरी पुरस्कार. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि वैशिष्ट्यपूर्ण कथाकथनाच्या माध्यमातून चित्रपटमांडणीच्या कक्षा रुंदावल्याबद्दल ज्युरीकडून चित्रपटाचे कौतुक 

Posted On: 28 NOV 2026 8:20PMby PIB MumbaiRelease ID: 2343254Views: 11

गोवा, 28 नोव्हेंबर 2026

लोरेन्झो फेरो आणि लुकास ए. विग्नाले दिग्दर्शित 'द रिव्हर ट्रेन' हा अर्जेंटिनी चित्रपट 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'सिल्व्हर पीकॉक स्पेशल ज्युरी पुरस्काराचा मानकरी ठरला.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार आणि महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थितीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या चित्रपटाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चित्रपटाच्या वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटिक अभिव्यक्तीची दखल घेत, परीक्षकांनी त्याच्या प्रायोगिक स्वरुपातील कथाकथन शैलीचे आणि मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रपटमाध्यमाच्या शक्यतांचा शोध घेण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. दिग्दर्शकांनी पारंपरिक सिनेमॅटिक सीमा ओलांडण्याची तयारी दाखवली असल्याचे अधोरेखित करताना प्रशस्तिपत्रात म्हटले आहे:

“एका बालकाच्या नजरेतून चित्रपट खेळाच्या मैदानात रूपांतरित केल्याबद्दल आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे चित्रपट निर्मितीच्या सीमा विस्तारल्याबद्दल, आम्ही दोन्ही दिग्दर्शकांच्या दूरदृष्टीपूर्ण भावनेचा आणि लुकास ए. विग्नाले यांच्या स्मृतींचा गौरव करतो.”

दिग्दर्शकांच्या वतीने निर्माते व्हॅलेंटाईन तोर्रे आणि अभिनेत्री रिटा पॉल्स यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या समारंभात सह-दिग्दर्शक लुकास ए. विग्नाले यांनी चित्रपटात दिलेल्या त्यांच्या सर्जनशील योगदानाची दखल घेण्याबरोबरच त्यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, कलात्मक उपलब्धी आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट अभिव्यक्ती दर्शविणाऱ्या चित्रपटाला 'विशेष ज्युरी पुरस्कार' देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप 'सिल्व्हर पीकॉक' -रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 20 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

'द रिव्हर ट्रेन'चे कथासूत्र

अर्जेंटिनातील एका दुर्गम गावात राहणारा नऊ वर्षांचा मायलो त्याच्या गावी 'मालम्बो' नृत्याचे धडे घेत असतो. मात्र, त्याची काही वेगळीच स्वप्ने असतात. त्याला रेल्वेने प्रवास करायचा असतो आणि त्याने आतापर्यंत फक्त चित्रपटांतच पाहिलेले — ब्युनोस आयर्स हे शहर त्याला पाहायचे असते. आपल्या या छोट्याशा जगातून बाहेर पडण्यासाठी, त्याला एकाकीपणाने भरलेल्या नवीन प्रवासाला सुरुवात करण्याचे धारिष्ट्य दाखवणे भाग असते.

'द रिव्हर ट्रेन'च्या पत्रकार परिषदेची लिंक

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

***

हर्षल अकुडे/मंजिरी गानू/परशुराम कोर


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2343254
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026