गोवा, 27 नोव्हेंबर 2026
भूमिकांच्या दृष्टीकोनातून सादर केलेल्या कथेचे महत्त्व, संशोधनावर आधारित चित्रपट निर्मिती आणि विविध कथा प्रेक्षकांसमोर मांडण्याची चित्रपटाची ताकद हे विषय 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या केंद्रस्थानी होते. दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग व निर्माते रविंद्र संघवी यांनी ‘द केरळ स्टोरी 2 – गोज बियाँड अँड द डॉक्युमेंटरी डेमोग्राफी इज डेस्टीनी’ या चित्रपटांसाठीचे संशोधन, भूमिकांचा विकास आणि चित्रपटातून गुंतागुंतीचा विषय मांडताना येणाऱ्या समस्या याविषयी चर्चा केली.
द केरळ स्टोरी 2 चित्रपटाच्या दिग्दर्शनाबाबतचे अनुभव सांगताना कामाख्या नारायण म्हणाले की, हा चित्रपट भूमिकांच्या दृष्टीकोनातून सादर केलेली कथा आहे. भावनेचा एक समान धागा कायम ठेवून वेगवेगळ्या गोष्टी एकत्र गुंफणे आव्हानात्मक होते आणि सृजनाचे समाधान देणारेही होते. वेगवेगळ्या कथा एकत्र बांधताना त्यातील संगीताच्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. चित्रपटामध्ये तीन वेगवेगळ्या कथा असूनही एकच समान भावना त्यांना एकत्र बांधण्यात सहाय्यक ठरली असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यक्तीगत अनुभवांच्या अभ्यासावर आधारित व तथ्यात्मक संदर्भ असलेला हा चित्रपट आहे. भूमिकांचे अनुभव व भावना यातून त्याची कथा सादर करण्याचा विचार यामागे होता, असेही नारायण यांनी सांगितले. 'डेमोग्राफी इज डेस्टीनी' याविषयी बोलताना निर्माते रविंद्र संघवी दिग्दर्शक कामाख्या नारायण यांनी अनुभवांचे तपशील एका चित्रपटाच्या कथेद्वारे सादर करताना येणाऱ्या समस्या अधोरेखित केल्या.
प्रेक्षकांसमोर गुंतागुंतीची कथा सोप्या पद्धतीने सादर करताना त्यांना आपल्याशा वाटतील अशा भूमिका महत्त्वाच्या असतात असे कामाख्या यांनी स्पष्ट केले. माहितीपट निर्माता म्हणून असलेल्या अनुभवाविषयी बोलताना कामाख्या म्हणाले, “मी कामाची सुरुवात नेहमी माहिती गोळा करणे व मुलाखती घेण्यातून करतो. त्यानंतर कोणत्या व्यक्तींचे अनुभव कथेला आकार देण्यात मदत करू शकतील याचा शोध घेतो.”

त्यांनी चित्रपट निर्मितीतील दृश्यात्मक अस्सलपणाचे महत्त्वही विशद केले, ज्यामध्ये कथेला विश्वासार्हता देणाऱ्या चित्रीकरण स्थळांची निवड करणे समाविष्ट आहे. त्यांचा प्रवासाचा अनुभव आणि विविध ठिकाणांची माहिती यामुळे इच्छित दृश्यात्मक वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी योग्य ठिकाणे शोधण्यात त्यांना स्वत:चीच मदत झाली. चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात समाजमाध्यमांच्या भूमिकेवरही वक्त्यांनी प्रकाश टाकला, तसेच त्यांचा स्वतःचा सर्जनशील प्रवास हा त्यांना अर्थपूर्ण वाटणाऱ्या कथा सांगण्याच्या इच्छेनेच प्रेरित राहिला असल्याचे अधोरेखित केले.
विविध प्रदेश, भाषा आणि निर्मिती पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात इफ्फीच्या भूमिकेकडेही या चर्चेचा रोख वळला. सिंग यांनी निरीक्षण नोंदवले की, हा महोत्सव वेगवेगळ्या बजेटमध्ये आणि संसाधनांमध्ये काम करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना एकाच व्यासपीठावर आपली कलाकृती सादर करण्यास सक्षम करतो. डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यापूर्वीच, त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात इफ्फीनेच त्यांना आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि चित्रपट निर्मात्यांची ओळख करून दिली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.
_20261127190022_4b602b.jpeg)
विविध सिनेमॅटिक आवाजांना एकत्र आणण्याच्या महोत्सवाच्या दीर्घकालीन भूमिकेशी 'स्टोरीज विदाउट बॉर्डर्स' ही महोत्सवाची संकल्पना अत्यंत सुसंगत असल्याचे सिंग यांनी नमूद केले. या व्यासपीठामुळे लहान प्रदेशांतील आणि कमी ज्ञात भाषांमधील चित्रपटांना मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचता येते, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन कुलदीप मीना यांनी केले.
संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/सुरेखा जोशी/शैलेश पाटील/दर्शना राणे