57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

स्मार्ट बोर्डस वि. पारंपरिक फळा – ‘कबीर सर का आखरी लेसन’ चित्रपटाने इफ्फीमध्ये प्रेक्षकांना केले भावविवश


दिग्दर्शकाची तंत्रज्ञानाच्या युगातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील बदलत्या नात्यावरील प्रतिक्रिया

Posted On: 27 NOV 2026 3:17PMby PIB MumbaiRelease ID: 2342593Views: 3

गोवा, 27 नोव्‍हेंबर 2026

 

एकेकाळी अनेक पिढ्या घडविलेल्या शिक्षकांना बदलत्या काळात वर्गातील विद्यार्थ्यांशी जुळवून घेताना संघर्ष करावा लागत असेल तर काय होईल? हा प्रश्न ‘कबीर सर का आखरी लेसन’ चित्रपटाचा गाभा आहे. दिग्दर्शक सर्फराज आलम यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच हिंदी चित्रपट 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जागतिक स्तरावर प्रथमच प्रदर्शित करण्यात आला.

चित्रपटाचे दिग्दर्शक आलम बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील आपल्या बालपणीच्या शाळेत गेले असताना तिथे आलेल्या अनुभवांची प्रेरणा या चित्रपटामागे आहे. तिथे त्यांना दिसले की, पारंपरिक फळ्याची जागा आता स्मार्ट बोर्डने घेतली आहे आणि जुन्या शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे कठीण जात आहे. त्यांनी जे पाहिले त्यातून त्यांना शिक्षकी पेशातील बदलत्या वास्तवाचे दर्शन घडले आणि आजच्या शिक्षकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या आव्हानांची कल्पना आली.

पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) आज इफ्फी गोवा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी मी जेव्हा माझ्या शाळेत गेलो तेव्हा फळ्यांची जागा स्मार्ट बोर्डसनी घेतल्यामुळे माझ्या शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना करावा लागत असलेला संघर्ष मी पाहिला. त्यातूनच मला या चित्रपटाची कल्पना सुचली.”

बिहारमधील एका गावातील साध्या शाळेतून सुरू झालेल्या आणि रशियामधील वैद्यकीय शिक्षण ते न्यू यॉर्क फिल्म अकादमीमधील प्रशिक्षणापर्यंतच्या आपल्या प्रवासाविषयी सांगताना आलम शिक्षकांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव आणि मातीशी आजही कायम असलेले नाते याविषयी बोलले.

एकेकाळी डॉक्टर, अभियंते आणि नागरी सेवेतील अधिकारी  यांच्या पिढ्या घडवणारे शिक्षक आज तंत्रज्ञानातील अडथळे आणि अध्यापन व्यवसायाबद्दल बदलत्या दृष्टिकोनाचा सामना करत आहेत, असे त्यांनी सांगितले. “आज हे शिक्षक ज्या परिस्थितीला सामोरे जात आहेत आणि त्यांच्याशी ज्या प्रकारे वागले जात आहे, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. देशभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट आपलासा वाटेल,” असे ते म्हणाले.

कार्टिना एंटरटेनमेंट अँड स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निर्मिती असलेल्या या 103.52 मिनिटांच्या हिंदी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते विनय पाठक यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आलम यांनी पाठक यांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील बदलत्या नातेसंबंधांवरही त्यांनी भाष्य केले. पूर्वी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात असलेले जवळचे भावनिक नाते आजच्या शिक्षणपद्धतीत हळूहळू लोप पावत असल्याचे त्यांनी नमूद केले. विचारपूर्वक संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, तरुणांनी इतरांबद्दल वाईट बोलण्याऐवजी बारकाईने निरीक्षण करावे आणि इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे, असे आवाहन त्यांनी केले.

बिहारविषयी बोलताना आलम यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख केला. तसेच बिहारचा विकास आणि राज्याने केलेली यशस्वी कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात चित्रपटसृष्टी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे त्यांनी अधोरेखित केले.

फळ्यांपासून स्मार्ट बोर्डपर्यंत झालेल्या प्रवासापलीकडे जाऊन 'कबीर सर का आखरी लेसन' हा चित्रपट शिक्षकांबाबत असलेला आदर, बदलत्या पिढ्या आणि बदलत्या समाजव्यवस्थेत शिक्षकांचे स्थान यांसारखे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतो. चित्रपट निर्मात्याच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित ही कथा भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडणाऱ्या एका सार्वत्रिक नात्याला स्पर्श करते.

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ‘सीमाविरहित कथा’ (Stories Without Borders) या संकल्पनेशी हा चित्रपट सुसंगत आहे.

विवेक विश्वास यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पाहा:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/सुरेखा जोशी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2342593
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026