Posted On:
27 NOV 2026 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI - Competition Commission of India) समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड – स्कीम आय एलव्हीएफ, समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड 3 इंडिया, कॅलिक्स कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि असोसिएटेड रोड कॅरियर्स लिमिटेड यांच्यातील प्रस्तावित एकत्रीकरणाला मंजुरी दिली आहे.
या प्रस्तावित एकत्रीकरणानुसार, समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड – स्कीम आय एलव्हीएफ, आणि समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड 3 इंडिया (एकत्रितपणे समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड) हे कॅलिक्स कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेडमधील (कॅलिक्स) हिस्सा संपादित करतील. त्यानंतर, कॅलिक्स ही कंपनी असोसिएटेड रोड कॅरियर्स लिमिटेडमधील (ARC) हिस्सा संपादित करेल आणि प्रस्तावित योजनेनुसार कॅलिक्सचे असोसिएटेड रोड कॅरियर्स लिमिटेडमध्ये विलीनीकरण केले जाईल.
समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड हे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ नियमन, 2012 अंतर्गत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) नोंदणीकृत असलेले श्रेणी 2 चे पर्यायी गुंतवणूक निधी आहेत. समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडचे व्यवस्थापन किंवा सल्लामसलतीसंदर्भातले कामकाज हे समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट एलएलपी (LLP) या त्यांच्या गुंतवणूक व्यवस्थापक संस्थेद्वारे पाहिले जाते.
कॅलिक्स ही 2006 मध्ये भारतात स्थापन झालेली एक खाजगी मर्यादित कंपनी आहे. ही कंपनी भारतात कंटेनर मालवाहू स्थानक सुविधा पुरवण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे.
असोसिएटेड रोड कॅरियर्स लिमिटेड ही 1972 मध्ये भारतात स्थापन झालेली एक बिगरसूचीबद्ध सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे. ही कंपनी रसद पुरवठा व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स) आणि भूपृष्ठीय वाहतूक सेवा पुरवण्याच्या व्यवसायात कार्यरत असून, तिचे कामकाज संपूर्ण भारतभर विस्तारलेले आहे.
नितीन फुल्लुके /तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai