57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

जगातील 54 देशांतून आलेल्या 2,288 प्रतिनिधींसह 57 व्या इफ्फीमध्ये वेव्हज चित्रपट बाजाराच्या 20 व्या वर्षीचा कार्यक्रम संपन्न


सहनिर्मिती बाजारात 220 बीटूबी बैठकांच्या माध्यमातून 14 सामंजस्य करार आणि इतर करार अंतिम टप्प्यामध्‍ये

Posted On: 25 NOV 2026 8:41PMby PIB MumbaiRelease ID: 2341660Views: 5

गोवा, 25 नोव्‍हेंबर 2026

 

जगातील 54 देशांतून आलेल्या 2,288 प्रतिनिधी आणि 471 खरेदीदारांसह वेव्हज चित्रपट बाजाराने चित्रपट निर्मात्यांना एकमेकांशी जोडणे, प्रतिभेची जोपासना करणे तसेच भारतीय चित्रपट सृष्टी आणि जागतिक चित्रपट विश्व यांच्यातील सेतूचे कार्य करण्याची दोन दशकांची जबाबदारी पूर्ण केली. 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) अनुषंगाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे (एनएफडीसी) आयोजित करण्यात आलेल्या या पाच दिवसांच्या बाजारामध्ये, भारत-चिली सह-निर्मितीसाठी दोन स्वारस्य पत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्या तर व्यापारांमधील चर्चेनंतर 14 सामंजस्य करार आणि इतर करार पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यावर आहेत.

पत्रसूचना कार्यालयाने (पीआयबी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त सचिव प्रभात म्हणाले की, सह-निर्मिती बाजाराने परस्परांशी थेट स्वरूपाच्या सुमारे 220 बैठका घडवून आणल्या.

इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर; एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग तसेच वेव्हज चित्रपट बाजारासाठी विशेष कर्तव्यावर असलेले अधिकारी श्रीरंग एम. यांनी देखील या चर्चेत भाग घेतला.

20 व्या वर्षीच्या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

सह-निर्मिती बाजार

  • आठ देश आणि 13 भारतीय भाषांसह एकूण 16 भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 25 प्रकल्पांनी बाजारात भाग घेतला.
  • अतिरिक्त व्यावसायिक संवादांसह, परस्परांशी थेट स्वरूपाच्या सुमारे 220 बैठका आयोजित करण्यात आल्या.
  • निवडल्या गेलेल्या फिचर प्रकल्पांपैकी हुर्डा (दॅट टाईट ग्रीन टॉप) या प्रकल्पासाठी निर्माता म्हणून खान अँड कुमार मिडिया या निर्मिती कंपनीने जबाबदारी घेतली.
  • भारत-चिली सह-निर्मितीसाठी दोन स्वारस्य पत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

प्रकल्प विकास आणि चित्रपट उद्योगांतील संधी

वेव्हज चित्रपट बाजारातील सह-निर्मिती बाजार, पटकथाकारांची प्रयोगशाळा, प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांची प्रयोगशाळा तसेच ‘व्ह्यूईंग रूम’ यांच्या माध्यमातून वेव्हज चित्रपट बाजाराने विकासाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या प्रकल्पांना पाठबळ पुरवले.

  • 170 प्रकल्पांचे अर्ज, ‘व्ह्यूईंग रूम’ मध्ये 608 अभ्यागतांनी सुमारे 100 तासांमध्ये 155 चित्रपट पाहिले. या प्रकल्पांनी 11 देश आणि विस्तृत श्रेणीतील भाषांचे प्रतिनिधित्व केले.
  • बंगळूरु आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रदर्शनासाठी विचारात घेण्याकरिता 'व्ह्यूइंग रूम'मधून चार लघुपट निवडले जाणार आहेत. पॅनोरमा स्टुडिओज चित्रपटगृहातील वितरण, विमानातील मनोरंजन कार्यक्रम आणि चित्रपटगृहेतर हक्कांसाठी प्रकल्पांचा विचार करत आहे.
  • 'वर्क-इन-प्रोग्रेस लॅब' विभागातून आलेल्या 53 प्रवेशिकांमधून पाच प्रकल्पांची निवड करण्यात आली. प्रत्येक प्रकल्पाला चित्रपट उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शकांकडून तीन मार्गदर्शन सत्रांचा लाभ मिळाला.
  • 'स्क्रीनरायटर्स लॅब'मध्ये, निवड झालेल्या संचिता सिन्हा यांच्या 'द जॅपनीज वाईफ' या प्रकल्पासाठी चित्रपट निर्माते संतोष सिंग आणि सुपर झिरो फिल्म्स, ट्रॅव्हलिन बोन एंटरटेनमेंटसोबत दिग्दर्शक आणि सह-निर्माते म्हणून सहभागी झाले.

पुरस्कार आणि व्यावसायिक साहाय्य

वेव्ह्स फिल्म बाजारने आर्थिक अनुदान, वितरणाच्या संधी, फेलोशिप, कलाकार निवड सेवा आणि पोस्ट-प्रॉडक्शन सहाय्याच्या माध्यमातून प्रकल्पांना आर्थिक आणि व्यावसायिक साहाय्य दिले.

  • एनएफडीसी रोख अनुदान:
    • गरिमा पुरा दिग्दर्शित 'नोज बोन' या चित्रपटाला 10,000 अमेरिकी डॉलर्सचे अनुदान.
    • रिधम जानेवे दिग्दर्शित 'गुडबाय मिस्टर डी'मेलो' आणि श्रीमयी सिंग दिग्दर्शित 'फायरफ्लॉवर्स' यांना प्रत्येकी 5,000 अमेरिकी डॉलर्सचे अनुदान.
  • रिबॉर्न इंडिया फिल्म आर्थिक अनुदान: कुशल किशोर आणि कुशाग्र किशोर दिग्दर्शित 'अँड ऑन दॅट डे...' ला 1 लाख रुपयांचे अनुदान.
  • मुकेश छाबरा कास्टिंग पुरस्कार: 'गुडबाय मिस्टर डी'मेलो' साठी विनामूल्य कलाकार निवड सेवा.
  • प्रसाद कॉर्पोरेशन पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार: आदित्य वेंपत्ती दिग्दर्शित 'नाधी' या चित्रपटाला प्रदान 
  • मिका क्रिएटिव्ह फेलोशिप: अजित वेलायुधन दिग्दर्शित 'आट्टुमली' (बाय द रिव्हर) या चित्रपटाला प्रदान
  • मुव्हीबफ पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार: 'आराम नगर', 'कारेन्ग' आणि 'चकाचौंध' या चित्रपटाला प्रदान
  • रिबॉर्न इंडिया फिल्म वितरण पुरस्कार: मनीष सैनी दिग्दर्शित 'भाई बँड' (वन टू थ्री माइक चेक) या चित्रपटाला प्रदान
  • वर्क-इन-प्रोग्रेस लॅब पुरस्कार:
    • प्रसाद कॉर्पोरेशन पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार 'द गार्डन ऑफ अस' या चित्रपटाला प्रदान, तसेच 'फॅमिली मॅटर', 'साजा (द ब्लॅकस्टोन रेशो)' आणि 'व्हेअर हॅज द रिव्हर गॉन' या चित्रपटांचा विशेष उल्लेख.
    • न्युब स्टुडिओ पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार: 'आट्टुमली (बाय द रिव्हर)' या चित्रपटाला.
    • आयआयसीटी वर्क-इन-प्रोग्रेस लॅब पुरस्कार ‘द गार्डन ऑफ अस' या चित्रपटाला

पॅव्हिलियन्स, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स

  • या बाजारपेठेत 12 राज्यांचे आणि चार देशांचे पॅव्हिलियन्स उभारण्यात आले होते. भागीदार देश म्हणून रशिया सहभागी झाला होता.
  • या बाजारपेठेत एकूण 22 व्यावसायिक दालने होती.
  • तंत्रज्ञान विभागात नेटफ्लिक्स आणि डॉल्फिन एआय यासारख्या कंपन्यांचा समावेश होता. डॉल्फिन एआय’ने या बाजारपेठेत आपल्या एआय स्टुडिओचा प्रारंभ केला.
  • वेव्हएक्स स्टार्टअप प्रदर्शनात प्रसारमाध्यमे, मनोरंजन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांत कार्यरत असलेले 10 स्टार्टअप्स एकत्र आले होते.
  • कार्यक्रमानंतर मिळालेल्या अभिप्रायानुसार, सहभागी स्टार्टअप्सनी एकूण 299 हून अधिक बैठका घेतल्या आणि सहा स्टार्टअप्समध्ये 14 व्यावसायिक करार झाले. यामध्ये एका सामंजस्य कराराचा समावेश आहे.

ज्ञान मालिका

21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ज्ञान मालिकेत 25 परिसंवाद झाले. या सत्रांमध्ये भारत आणि इतर देशांतील सुमारे 127 वक्ते आणि 17 सूत्रसंचालक सहभागी झाले होते. नेटफ्लिक्स इंडिया, प्राइम व्हिडिओ आणि ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज् यांसारख्या आघाडीच्या उद्योग प्रतिनिधींनीही या सत्रांमध्ये भाग घेतला. या परिसंवाद सत्रांमध्ये पुढील विषयांचा समावेश होता:

  • भारतीय कथा आणि जागतिक पटलावर त्यांचा बौद्धिक संपदा म्हणून उदय.
  • स्ट्रिमिंग क्षेत्रातील बदलते प्रवाह आणि मनोरंजन क्षेत्राचे बदलते स्वरूप.
  • स्वतंत्र चित्रपटसृष्टी आणि आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती.
  • चित्रपटांसाठी अर्थसहाय्य आणि प्रादेशिक चित्रपट निर्मिती उद्योग.
  • एव्हीजीसी-एक्सआर अर्थात ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्याने येत असलेले तंत्रज्ञान.
  • प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील भविष्यातील सर्जनशील कौशल्ये आणि संधी.

या सत्रांमध्ये चित्रपट निर्माते, अभिनेते, निर्माते, ओटीटी मंचांचे कार्यकारी अधिकारी, चित्रपट महोत्सवांचे कार्यक्रम नियोजक, वितरक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमांचा परिणाम दिसून येण्यासाठी काही काळ जावा लागेल, असे निरीक्षण नोंदवत प्रभात म्हणाले, “या संवादांमधून, मोठ्या संख्येने झालेल्या बी2बी बैठकांमधून आणि उत्स्फूर्त चर्चांमधून मिळणारे परिणाम कदाचित पुढील वर्षी, त्यानंतरच्या वर्षी किंवा आणखी तीन-चार वर्षांत दिसून येतील.”

आशुतोष गोवारीकर यांनी मानवी सर्जनशीलता आणि भावनांचे महत्त्व कायम राखत उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज अधोरेखित केली. कृत्रिम बुद्धिमत्ता हे चित्रपट निर्मात्यांना सहाय्य करणारे साधन असू शकते; मात्र ते मानवी अभिव्यक्तीची जागा घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चित्रपटातून अभिव्यक्तीच्या शक्यता अधिक विस्तारतील; मात्र आशयप्रधान चित्रपटांचे महत्त्व त्यामुळे कमी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीराग एम. यांनी स्वतंत्र भारतीय चित्रपटसृष्टीला या उपक्रमातून मिळणाऱ्या योगदानाकडे लक्ष वेधले. ‘आट्टम’, ‘बूम’ आणि ‘अंग’ यांसारख्या चित्रपटांची उदाहरणे देत त्यांनी सांगितले की, वेव्हज् फिल्म बझारकडून पाठबळ मिळालेल्या या चित्रपटांना पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सय्यद रबीहाश्मी यांनी केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2341660
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026