Posted On:
25 NOV 2026 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026
राष्ट्रीय महामार्गांवरील आपत्कालीन सेवा अधिक मजबूत करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यापूर्वी आपत्कालीन व्यवस्थापन सेवांच्या (आयएमएस) उपलब्धतेची खात्री करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रस्ते सुरक्षा मजबूत करणे तसेच अपघात, वाहनांमधील बिघाड आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना वेळेवर मदत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन सेवांमध्ये राष्ट्रीय महामार्गांवर रुग्णवाहिका, मार्गावर गस्त घालणारी वाहने आणि टो-अवे क्रेनची उपलब्धता समाविष्ट आहे. या सेवांना घटनास्थळी तैनात असलेल्या पथकांचे एनएचएआय’च्या 1033 या राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइनशी एकत्रीकरण करून तसेच स्थानिक पोलीस, अग्निशमन सेवा आणि रुग्णालयांशी समन्वय साधून मदत दिली जाते.
ही मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीय महामार्गाच्या विविध श्रेणीतील मार्गांवर या सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत तरतुदी प्रदान करतात. अपघातांची आकडेवारी आणि त्या मार्गाच्या गरजेनुसार, सध्या वाहतुकीसाठी खुल्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या मार्गिंकांवरील टोल नाक्यांवर किंवा इतर योग्य ठिकाणी रुग्णवाहिका तैनात केल्या जातात.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'एनएचएआय’कडे सोपवलेल्या राष्ट्रीय महामार्गांसाठी, प्राधिकरणाच्या क्षेत्रीय कार्यालयांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार एका केंद्रीय संस्थेमार्फत रुग्णवाहिका तैनात केल्या जातील.
या व्यवस्थेनुसार, मंत्रालयाच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाशी किंवा राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाशी समन्वय साधून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केंद्रीय यंत्रणेमार्फत रुग्णवाहिका तैनात करण्यात येतील. अशा मार्गिकांवर ग्रस्त घालणारी वाहने आणि टू इन क्रेन ची व्यवस्था संबंधित प्राधिकरणांकडून केली जाईल.
या उपक्रमाद्वारे, राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना वेळेवर मदत प्रदान करणे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्ग जाळ्यावरील एकूण सुरक्षितता वाढवणे, हे एनएचएआयचे उद्दिष्ट आहे.
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai