उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन 21 - 22 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर

Posted On: 20 NOV 2026 2:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 21 आणि 22 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान, उपराष्ट्रपती उद्या पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) येथे 2026 च्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

त्यानंतर, उपराष्ट्रपती तामिळनाडूतील चेन्नईला जातील. जिथे ते नेल्लाई नाडर मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूलच्या 42व्या वार्षिक दिन सोहळ्यात सहभागी होतील. 

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2338994) अभ्यागत कक्ष : 8