रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाहन विमा नूतनीकरणाबाबतचे एसएमएस संदेश जनजागृती मोहिमेचाच भाग असल्याचे एनएचएआयचे स्पष्टीकरण; टोल नाक्यांवर कोणतेही चलन किंवा दंड आकारला जाणार नाही


वाहन विम्याचे वेळेवर नूतनीकरण आणि वाहनमालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा या पूर्णपणे माहितीपर उपक्रमाचा उद्देश

Posted On: 19 NOV 2026 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय-नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया) स्पष्ट केले आहे की, वाहन विम्याच्या नूतनीकरणासंदर्भात निवडक राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना सध्या पाठवले जाणारे एसएमएस (लघु संदेश सेवा) हे प्रस्तावित जनजागृती उपक्रमाच्या चाचणीचा एक भाग आहेत.

हा उपक्रम पूर्णपणे माहितीपर आणि मार्गदर्शनपर असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्पष्ट केले आहे. या संदेशांच्या आधारे टोल नाक्यांवर कोणतेही चलन जारी केले जाणार नाही किंवा दंड आकारला जाणार नाही. ही एसएमएस प्रणाली टोल नाक्यांवरील कोणत्याही कायदेशीर कारवाईशी किंवा दंडात्मक कारवाईशी संबंधित नाही, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. वाहनमालकांना त्यांच्या मोटार विमा पॉलिसीची मुदत संपण्याच्या आगामी तारखांची आठवण करून देणे, हा या संदेशांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी वाहनमालकांनी वेळेत विम्याचे नूतनीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आगाऊ स्मरणपत्रे पाठवून जनजागृती करणे, जबाबदार वाहनमालकीला प्रोत्साहन देणे आणि रस्ते सुरक्षेसंदर्भातील कायदेशीर नियमांचे पालन करण्यास मदत करणे, हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) उद्दिष्ट आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि देशातील रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, यासाठी एनएचएआय कटिबद्ध आहे.

 
शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2338499) अभ्यागत कक्ष : 5