युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने भारतात शाश्वत क्रीडा लीग परिसंस्था उभारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली

Posted On: 18 NOV 2026 2:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2026

 

‘खेलो भारत नीती’ आणि ‘विकसित भारत @2047’ च्या दृष्टिकोनाला अनुसरून, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाने 14 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती भारतात अधिक व्यापक, व्यावसायिकरित्या व्यवस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत अशी क्रीडा लीग परिसंस्था विकसित करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करेल. एक मजबूत लीग संरचना निर्माण करण्याचा  मुख्य उद्देश खेळाडूंची गुणवत्ता ओळखण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित व उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देतानाच क्रीडा व्यवस्थापन, प्रसारण, तंत्रज्ञान, कार्यक्रमाचे आयोजन आणि संबंधित सेवा क्षेत्रांत खाजगी गुंतवणुकीला चालना देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.

देशातील विविध क्रीडा लीग्सनी विविध स्तरांवर यश मिळवले असले तरी, मजबूत क्रीडा आणि सामाजिक क्षमता असलेल्या अनेक क्रीडा प्रकारांना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्यावसायिक व्यवहार्यतेच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन, समिती सध्याच्या क्रीडा लीग परिसंस्थेचे मूल्यांकन करून लीग्सच्या स्थापनेवर आणि शाश्वततेवर परिणाम करणाऱ्या प्रमुख समस्या आणि मर्यादा जाणून घेईल तसेच प्राधान्यक्रमाचे खेळ व प्रकार, विशेषतः ऑलिम्पिक खेळ, महिलांचे खेळ, युवा खेळ, देशी खेळ आणि उदयोन्मुख खेळ, याची चाचपणी करून त्यांच्या क्रीडा आणि व्यावसायिक क्षमतेनुसार योग्य कार्यप्रणालीची शिफारस करेल. ही तफावत भरून काढण्यासाठी, समिती खाजगी क्षेत्र, क्रीडा संघटना, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समुदाय यांच्या सक्रिय सहभागासोबतच संरचित सरकारी सुलभता  यंत्रणांची तपासणी करेल. यामध्ये व्यवहार्यता तफावत निधी (VGF), प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आर्थिक सहाय्य, आणि सरकारी क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सवलतीच्या दरात प्रवेश यांसारख्या लक्ष्यित हस्तक्षेपांचे मूल्यांकन समाविष्ट आहे.

समितीला सध्याच्या परिसंस्थेतील मर्यादांचे मूल्यांकन करणे, प्राधान्यक्रमाचे खेळ व अनुरूप कार्यप्रणाली निश्चित करणे, तसेच कॉर्पोरेट भांडवल, फ्रँचायझी मालकी, प्रायोजकत्व, प्रसारण आणि डिजिटल हक्क, आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) वित्तपुरवठा आकर्षित करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, समिती युवक आणि महिलांमध्ये तळागाळातील सहभागाला चालना देण्यासाठी लीग्सना शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि स्थानिक क्लब्ससोबत एकत्रित करण्याच्या रणनीतीचा प्रस्ताव मांडेल. त्याचबरोबर, वित्तीय पारदर्शकता, खेळाडूंचे कल्याण, सचोटी यांचा समावेश असलेली एक संस्थात्मक प्रशासकीय चौकट आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींवर आधारित टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा आराखडा स्थापन करेल.

समितीची रचना खालीलप्रमाणे आहे:

अनु क्र.

नाव

पद

1.

कुणाल, सहसचिव (प्रशासन)

निमंत्रक

2.

विनील कृष्णा, सहसचिव (खेलो इंडिया)

सदस्य

3.

रघुराम अय्यर, मुख्य कार्यकारी अधिकारी , आयओए (IOA)

सदस्य

4.

बी. श्रीनिवासन, आरआयएल (RIL)

सदस्य

5.

हेमांग अमीन, सीओओ, आयपीएल, बीसीसीआय

सदस्य

6.

पी.के.एस.व्ही. सागर, जीएमआर स्पोर्ट्स

सदस्य

7.

संजय आडेसरा, अदानी स्पोर्ट्सलाइन

सदस्य

8.

दिव्यांशु सिंग, जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स

सदस्य

9.

इशान चॅटर्जी, जिओ हॉटस्टार

सदस्य

10.

राजेश कौल, सोनी पिक्चर्स

सदस्य

11.

अनुपम स्वरूप, डीडी स्पोर्ट्स

सदस्य

12.

पराग दराडे, झी एंटरटेनमेंट

सदस्य

13.

अभिजित भट्टाचार्य, बी.व्ही.एल

सदस्य

14.

ॲड. नंदन कामथ

सदस्य

 

राष्ट्रीय क्रीडा महासंघ, विद्यमान लीग अधिकारी, गुंतवणूकदार आणि क्रीडा तंत्रज्ञान कंपन्यांशी सल्लामसलत करण्याचे अधिकार असलेली ही समिती, प्रत्यक्ष, ऑनलाइन किंवा संमिश्र (हायब्रिड) स्वरूपात चर्चा करून आठ आठवड्यांच्या आत आपल्या अंतिम शिफारसी मंत्रालयाकडे सादर करेल.

 

* * *

नितीन फुल्लुके/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337826) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English , Urdu , Gujarati , Tamil