पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणात एकलव्य आदर्श निवासी शाळांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणारा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला.

Posted On: 15 NOV 2026 6:24PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

या लेखात एकलव्य आदर्श निवासी शाळांची वाटचाल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण करण्यात या शाळांची असलेली भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे पूर्वतयारी अभ्यासक्रम, द्विभाषिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुसज्ज वर्गखोल्या, क्रीडा आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचाही लेखात उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच, या शाळांमधील विद्यार्थ्यांनी आयआयटी, एम्स यांसारख्या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवल्याच्या यशस्वी कामगिरीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे की, 

एकलव्य आदर्श निवासी शाळांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन आदिवासी मुलांसाठी नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत.

जनजातीय गौरव दिनानिमित्त, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी एकलव्य आदर्श निवासी शाळांची वाटचाल आणि आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात या शाळांची असलेली भूमिका याविषयी लेख लिहिला आहे.

पूर्वतयारी अभ्यासक्रम, द्विभाषिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानस्नेही वर्गखोल्या, क्रीडा आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांची माहिती त्यांनी या लेखात दिली आहे. तसेच, या शाळांमधील विद्यार्थी आता आयआयटी, एम्स आणि देशातील इतर नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवत असल्याच्या यशाचाही त्यांनी उल्लेख केला आहे.

हा लेख आवर्जून वाचावा.

***

शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2336677) अभ्यागत कक्ष : 6