Posted On:
14 NOV 2026 3:18PM by PIB Mumbai
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त, संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, संसद सदस्य, माजी संसद सदस्य, लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंग आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांनीही या प्रसंगी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे अनावरण भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी 5 मे 1966 रोजी संविधान सदनच्या (तत्कालीन संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये केले होते.
***
राधिका अघोर/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai