Posted On:
13 NOV 2026 6:54PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित क्षेपणास्त्र सज्ज स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस सह्याद्रीने मलाबार 2026 सराव यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर 12 नोव्हेंबर 2026 रोजी जपानमधील योकोसुका नौदल तळावरून प्रस्थान केले.
या सरावात भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला. बंदर टप्प्यात व्यावसायिक स्तरावरील विविध उपक्रम, तर समुद्री टप्प्यात समन्वित सागरी मोहिमा पार पडल्या. https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2333046.
समुद्री टप्प्यात पाणबुडीविरोधी युद्धतंत्र, भेट, झडती आणि जप्ती (व्हीबीएसएस) सराव, सागरी प्रतिबंधात्मक मोहिमा, तोफांचा सराव, समुद्रात इंधन व अन्य सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी जहाजांजवळ जाण्याच्या प्रक्रिया आणि एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर हेलिकॉप्टर उतरवण्याचा सराव अशा विविध सागरी मोहिमा आणि सरावांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे सहभागी नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता, कार्यात्मक समन्वय आणि परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली.
बंदर टप्प्यात कार्यात्मक समन्वय, एकमेकांच्या जहाजांना भेटी, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम पार पडले. यामुळे सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्द निर्माण होण्यास आणि परस्पर संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली.
या सरावाची यशस्वी सांगता ही इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सहकार्य आणि सामूहिक सुरक्षेसाठी सहभागी नौदलांच्या सामायिक वचनबद्धतेची पुनर्पुष्टी करणारी ठरली. हे भारताच्या ‘महासागर’ (सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर व सर्वांगीण प्रगती) या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
(3)_20261113185520_ba978e.jpeg)
(3)_20261113185531_c25f3e.jpeg)
(3)_20261113185541_900ea3.jpeg)
(3)_20261113185554_4fcb2d.jpeg)
(3)_20261113185604_d166b8.jpeg)
***
Radhika Aghor / Gajendra Deoda / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai