शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय विद्यालय संघटनेच्या तीन प्रमुख डिजिटल उपक्रमांचा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केला शुभारंभ

Posted On: 12 NOV 2026 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2026

 

केंद्रीय शिक्षण मंत्री  प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय विद्यालय संघटनेच्या  तीन प्रमुख डिजिटल उपक्रमांचे उद्घाटन केले. यामध्ये ‘समीक्षा’ एआय बॉटसह एआय-एकात्मिक विद्या समीक्षा केंद्र (VSK), केव्हीएस-संवाद पालक कनेक्ट ॲप आणि वेब पोर्टल, तसेच केव्हीएस माजी विद्यार्थी कनेक्ट पोर्टल यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान-चलित, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने केव्हीएसच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 ची उद्दिष्टे साकार करण्याच्या आणि डिजिटल इंडियाचे स्वप्न पुढे नेण्याच्या दिशेने हे उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगून मंत्र्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि या उपक्रमांचा व्यापक स्वीकार व्हावा यासाठी त्यांना अधिक बळकट करण्यास व प्रदर्शित करण्यास भागधारकांना प्रोत्साहित केले. सर्व इयत्ता आणि ठिकाणे समाविष्ट करून देशातील प्रत्येक केंद्रीय विद्यालयापर्यंत या उपक्रमाचा विस्तार करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच भागधारकांनी सातत्यपूर्ण शिकण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा, परिणामांचे मूल्यमापन करावे आणि सुधारणा आवश्यक असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सुचवले.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या  सहकार्याने हा उपक्रम केवळ केव्हीएसपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण शालेय शिक्षण व्यवस्थेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी त्याचा विस्तार करावा, अशी सूचना  जोशी यांनी केली. शिक्षकांच्या क्षमता बांधणीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सर्वसमावेशक माहिती या पोर्टलमध्ये समाविष्ट करण्याची सूचना केली. यामध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सद्यस्थिती, प्रशिक्षणातील अंतराल, मागील प्रशिक्षणाच्या नोंदी आणि आगामी प्रशिक्षणाच्या गरजा यांचा तपशील असावा, असे त्यांनी नमूद केले. हा तपशील ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एकत्रित केल्यामुळे देखरेख करणे सोपे होईल आणि वेळेवर प्रशिक्षण सुनिश्चित करता येईल, यावर त्यांनी भर दिला.

   

आवश्यक माहिती आणि सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देणे हा केव्हीएस मुख्यालयाच्या आयटी सर्व्हिसेस सेलद्वारे स्वतःच विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे, ज्यामुळे पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकांचा मौल्यवान वेळ आणि श्रम वाचतील. शैक्षणिक सेवा अधिक सुलभ, प्रतिसादक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्याच्या केव्हीएसच्या वचनबद्धतेला हे उपक्रम अधिक दृढ करत आहेत.

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335422) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English , Tamil , Kannada