पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताचा 100वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्याबद्दल पंतप्रधानांकडून अनुज श्रीवास्तव यांचे अभिनंदन

Posted On: 10 NOV 2026 1:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2026

 

अनुज श्रीवास्तव यांनी प्रतिष्ठित ग्रँडमास्टर खिताब पटकावल्यानंतर भारताने बुद्धिबळ ग्रँडमास्टरचे शतक पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.

ही असाधारण कामगिरी असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भारताचा 100वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्याबद्दल अनुज श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले. ही एक विलक्षण कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने 100 ग्रँडमास्टरचा टप्पा गाठणे हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड असून, तो देशातील खेळाडूंची अफाट प्रतिभा, समर्पण आणि कठोर परिश्रम तसेच युवकांमध्ये बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता दर्शवतो, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या विविध भागांतून उदयास येणारे तरुण बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर आपली छाप पाडत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या कामगिरीमुळे आणखी अनेक तरुणांना बुद्धिबळ खेळण्याची आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पुढील संदेश सामायिक केला :

“भारताने बुद्धिबळात शतक पूर्ण केले आहे!

असाधारण कामगिरी आहे, नाही का?

आता भारतात 100 बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत!

भारताचा 100वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्याबद्दल अनुज श्रीवास्तव यांचे अभिनंदन! ही खरोखरच किती विलक्षण कामगिरी आहे!

भारताने 100 ग्रँडमास्टरचा टप्पा गाठणे हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड आहे. यातून आपल्या खेळाडूंची अफाट प्रतिभा, समर्पण आणि कठोर परिश्रम तसेच आपल्या युवकांमध्ये बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता दिसून येते.

देशाच्या विविध भागांतून उदयास येणारे तरुण बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर आपली छाप पाडत असल्याचे पाहणे विशेष आनंददायी आहे.

या कामगिरीमुळे आणखी अनेक तरुणांना बुद्धिबळ खेळण्याची आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळो.”

 

* * *

नितीन फुल्लुके/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2334623) अभ्यागत कक्ष : 9