Posted On:
09 NOV 2026 8:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित अलीकडील घडामोडींबाबत आपला दृष्टिकोन मांडला.
पंतप्रधान मोदी यांनी भारताचा मानव-केंद्रित दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला आणि हा संघर्ष चर्चेद्वारे व मुत्सद्देगिरीने सोडवला जावा, या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची भारताची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांच्या जनतेच्या परस्पर हितासाठी विविध क्षेत्रांमधील भारत-युक्रेन द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा केली.
निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com