संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल आयएनएस चिल्का येथे अग्निवीरांच्या सर्वात मोठ्या तुकडीचे दीक्षांत संचलन आयोजित करणार

Posted On: 09 NOV 2026 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर  2026

आयएनएस चिल्का ही भारतीय नौदलाची प्रशिक्षण आस्थापना, 13 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय नौदलाच्या अग्निवीर आणि भारतीय तटरक्षक दलाच्या नाविकांच्या नवव्या तुकडीचे दीक्षांत संचलन आयोजित करणार आहे. एडमिरल कृष्णा स्वामीनाथन, नौदल प्रमुख आणि पॅरा चीफ हे या संचलनाचे परिक्षण करणार आहेत.

16 आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणारे 3,300 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी या संचलनात सहभागी होतील. आयएनएस चिल्कामधून उत्तीर्ण होणारी ही सर्वात मोठी तुकडी असेल. हे संचलन म्हणजे शिस्तबद्ध, शारिरीकदृष्ट्या चपळ, मानसिकदृष्ट्या लवचिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम सागरी योद्धांमध्ये तरुण भरती करण्यासाठी रचना केलेल्या सघन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ असेल.

या प्रशिक्षण अभ्यासक्रमात शैक्षणिक, शारीरिक अनुकूलन, पोहणे, परेड प्रशिक्षण, मैदानी क्रियाकलाप आणि शिबिराचा एकत्रित समावेश आहे, तसेच तो प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक प्रवासासाठी एक समग्र पाया प्रदान करतो. कर्तव्य, सन्मान आणि धाडस या नौदल मूल्यांची पायाभरणी करताना चारित्र्यनिर्मिती, नेतृत्व, शिस्त, सौहार्द आणि संघकार्य यावर समान भर दिला जातो.

दीक्षांत संचलन हा प्रशिक्षणार्थींसाठी अभिमानाचा आणि कर्तृत्वाचा क्षण असेल, कारण त्यांचे कुटुंबीय प्रशिक्षण प्रवासाचा सर्वोच्च बिंदू आणि नवीन करिअरच्या सुरुवातीचे साक्षीदार आहेत. याशिवाय नौदल दिग्गज आणि मान्यवर पाहुणेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाईस एडमिरल समीर सक्सेना, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न नेव्हल कमांड हे असतील. गुणवंत प्रशिक्षणार्थी, चॅम्पियन विभाग आणि उत्कृष्ट प्रशिक्षक यांना त्यांच्या अनुकरणीय कामगिरीबद्दल आणि प्रशिक्षणातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान केले जातील. या कार्यक्रमात अंकुर या द्विभाषिक प्रशिक्षणार्थी मासिकाचे अनावरण देखील होणार आहे.

हे दीक्षांत संचलन भारतीय नौदलाच्या अधिकृत समाज माध्यमावर थेट प्रक्षेपित केले जाईल, ज्यामुळे देशभरातील नागरिकांना या सोहळ्याचे साक्षीदार होता येईल.


माधुरी पांगे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2334448) अभ्यागत कक्ष : 11