संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'आयएनएस सूरत' मस्कत येथे दाखल

Posted On: 09 NOV 2026 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर  2026

भारतीय नौदलाचे आयएनएस 'सूरत' हे जहाज  भारत आणि ओमानचे शाही नौदल यांच्यातील द्विपक्षीय सागरी सराव ‘नसीम अल बहर’ च्या 15 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आणि त्यानंतरच्या समन्वयीत गस्तीसाठी 8 नोव्हेंबर 2026 रोजी ओमानमधील मस्कत येथे पोहोचले.

या सरावामध्ये बंदर आणि सागरी टप्प्यांदरम्यान व्यावसायिक सरावांचा समावेश असेल, ज्यामध्ये परस्परांच्या जहाजांवर भेटी, परिचालनात्मक संवाद आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. सरावातील या उपक्रमांमुळे दोन्ही नौदलांच्या जवानांना आपापल्या अनुभवांची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची, आंतरपरिचालनक्षमता वाढवण्याची आणि परस्पर समज वाढवण्याची संधी मिळेल.

बंदराला भेट देण्याचा हा उपक्रम भारत आणि ओमानमधील  जुन्या संबंधांवर आधारित असून तो दोन्ही देशांदरम्यान मजबूत आणि चिरकाल टिकणाऱ्या सागरी भागीदारीला अधोरेखित करत आहे. भारत सरकारच्या 'महासागर' म्हणजेच प्रदेशांच्या सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती   या दृष्टीकोनाशी तो सुसंगत आहे आणि 24 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या संयुक्त लष्करी सहकार्य समितीच्या 13 व्या बैठकीदरम्यान निर्माण झालेल्या गतिशीलतेला चालना देण्याची संधी प्रदान करत आहे.

 

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2334381) अभ्यागत कक्ष : 7