पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानच्या झुनझुनू इथे झालेल्या अपघातातील जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पीडितांना पीएमएनआरएफ मधून मदत जाहीर

Posted On: 02 NOV 2026 5:03PM by PIB Mumbai

‍नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर  2026

राजस्थानच्या झुनझुनू इथे झालेल्या अपघातातील जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसेच जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:

राजस्थानच्या झुनझून इथे झालेल्या अपघातातील जीवित हानीचे वृत्त दु:खद आहे. माझ्या सहवेदना, मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अपघातातील जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, हीच प्रार्थना !

या अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना, पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची  तसेच जखमींना, 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi

निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2331645) अभ्यागत कक्ष : 11