Posted On:
01 NOV 2026 12:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कन्नड राज्योत्सवानिमित्त कर्नाटकच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. कर्नाटक हे समृद्ध परंपरा, उल्लेखनीय यश आणि अपार शक्यतांची भूमी आहे. या राज्याचा गौरवशाली वारसा आणि कालातीत परंपरांनी आपल्या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीला समृद्ध केले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
“कर्नाटकच्या जनतेने आपल्या कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि उल्लेखनीय कौशल्यांच्या जोरावर, विशेषतः भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये, आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश उद्योगापासून कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत उत्पादन क्षेत्र आणि स्टार्टअप्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये कर्नाटकच्या जनतेने वारंवार आपले कौशल्य सिद्ध केले आहे,” असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी एक्स वरील पोस्टमध्ये सांगितले:
कन्नड राज्योत्सवाच्या आनंददायी प्रसंगी कर्नाटकच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा!
कर्नाटक हे समृद्ध परंपरा, उल्लेखनीय यश आणि अपार शक्यतांची भूमी आहे. या राज्याचा गौरवशाली वारसा आणि कालातीत परंपरांनी आपल्या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीला समृद्ध केले आहे.
कर्नाटकच्या जनतेने आपल्या कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि उल्लेखनीय कौशल्यांच्या जोरावर, विशेषतः भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये, आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश उद्योगापासून कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत उत्पादन क्षेत्र आणि स्टार्टअप्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये कर्नाटकच्या जनतेने वारंवार आपले कौशल्य सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावरील गंभीर आव्हानांवर उपाय उपलब्ध करून देण्यात ते आघाडीवर आहेत.
हा विशेष दिवस जनतेच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
***
यश राणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai