पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी तामिळनाडू दिनानिमित्त तामिळनाडूच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 NOV 2026 12:49PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू दिनानिमित्त तामिळनाडूच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तामिळनाडूच्या कष्टाळू आणि उद्यमशील जनतेने भारताच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिले आहे, असे मोदी यांनी सांगितले. उत्पादन, वाहन उद्योग आणि वस्त्रोद्योगापासून इलेक्ट्रॉनिक्स, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि उदयोन्मुख उद्योगांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये या राज्याने नावीन्य, कौशल्य आणि औद्योगिक उत्कृष्टतेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

“तामिळनाडूच्या जनतेला आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि परंपरांचा मोठा अभिमान आहे. तामिळ संस्कृतीने आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक प्रवासात असंख्य प्रकारे समृद्ध योगदान दिले आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्सवर केलेली पोस्ट:

तामिळनाडू दिनाच्या विशेष प्रसंगी तामिळनाडूच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा!

तामिळनाडूच्या कष्टाळू आणि उद्यमशील जनतेने भारताच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. उत्पादन, वाहन उद्योग आणि वस्त्रोद्योगापासून इलेक्ट्रॉनिक्स, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि उदयोन्मुख उद्योगांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये या राज्याने नावीन्य, कौशल्य आणि औद्योगिक उत्कृष्टतेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तामिळनाडूच्या जनतेला आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि परंपरांचा मोठा अभिमान आहे. तामिळ संस्कृतीने आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक प्रवासात असंख्य प्रकारे समृद्ध योगदान दिले आहे.

येत्या काळात हा विशेष दिवस तामिळनाडूच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद, यश आणि नव्या संधी घेऊन येवो.

***

यश राणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2331165) अभ्यागत कक्ष : 12