भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडद्वारे इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरमधील संपूर्ण भांडवलाच्या अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी

Posted On: 31 OCT 2026 2:20PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडद्वारे (अधिग्रहणकर्ता) इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडमधील (लक्ष्य) भागभांडवलाच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे.

प्रस्तावित एकत्रीकरणानुसार अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ/विक्रेता 1) आणि एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल/विक्रेता 2) यांच्याकडून इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे 100% भागभांडवल अधिग्रहित करणार आहे.

अधिग्रहण करणारी कंपनी ही अदानी समूहाचा एक भाग असून भारतातील एक सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी आहे. तिचे समभाग बीएसई लिमिटेड तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचीबद्ध आहे. ही कंपनी प्रामुख्याने विजेचे पारेषण आणि वितरण तसेच भारतात विजेसाठी प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड  ही कंपनी इतर गोष्टींबरोबरच भारतात विजेसाठी प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधांशी संबंधित कार्यात सहभागी आहे. याशिवाय भारतात काही स्मार्ट गॅस मीटर्सच्या स्थापनेतही तिचा सहभाग आहे.

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330873) अभ्यागत कक्ष : 16