वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गुजरातच्या एकता नगर येथे आयोजित 'भारत पर्व 2026' मधील 'सीसीआयसी' दालनाला भेट दिली


'सीसीआयसी'ने भारताचा समृद्ध हातमाग आणि हस्तकला वारसा प्रदर्शित केला; कारागीर व विणकरांचे सक्षमीकरण करण्यासोबतच 'व्होकल फॉर लोकल' आणि 'लोकल टू ग्लोबल'ला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले अधोरेखित

Posted On: 31 OCT 2026 10:48AM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली 'भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ लिमिटेड' (सीसीआयसी ) गुजरातच्या केवडिया, एकता नगर येथे सुरू असलेल्या 'भारत पर्व 2026' मध्ये सहभागी झाली आहे. 30 ऑक्टोबर 2026  रोजी पंतप्रधान मोदी यांनी एकता नगर, केवडिया येथील 'सीसीआयसी' दालनाला भेट दिली, तेव्हा हा 'सीसीआयसी'साठी अत्यंत अभिमानास्पद आणि संस्मरणीय क्षण ठरला. या भेटीमुळे 'सीसीआयसी'ला आपला समृद्ध वारसा, कारागीर व विणकरांसोबतचे दीर्घकालीन संबंध आणि भारताच्या पारंपरिक हातमाग व हस्तकला वारशाच्या संवर्धनासाठी सुरू असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.

'सीसीआयसी'चे दालन  कारागीर आणि विणकरांना बाजारपेठेपर्यंत उत्तम पोहोच आणि उपजीविकेच्या शाश्वत संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवण्याच्या महामंडळाच्या  प्रवासाचे दर्शन घडवते. आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून, सीसीआयसी भारताच्या पारंपरिक हस्तकलेला व्यापक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडून, “व्होकल फॉर लोकल” या संकल्पनेसाठी सक्रियपणे योगदान  देत आहे आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर नेत आहे.

या दालनात देशाच्या विविध भागांमधील कारागिरांचे असाधारण कौशल्य आणि हस्तकला याचे दर्शन घडत आहे. यामध्ये गुजरातच्या कारागिरांचाही समावेश आहे. त्यांनी 'अगेट' (Agate) स्टोन आणि मौल्यवान खड्यांपासून बनवलेल्या पारंपरिक कलाकृतीबरोबरच अतिशय बारकाईचे 'ॲप्लिक' (Appliqué) काम येथे पाहायला मिळते.

सीसीआयसी भारतीय हातमाग आणि हस्तकलेच्या समृद्ध व वैविध्यपूर्ण वारशाचा उत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने देशभरातील उत्कृष्ट कलात्मकता, सर्जनशीलता आणि हस्तकौशल्य एकाच व्यासपीठावर आले आहे. येथे अशा अनेक पारंपरिक आणि हस्तनिर्मित वस्तू प्रदर्शित केल्या आहेत, ज्या भारताचा जिवंत सांस्कृतिक वारसा आणि येथील स्वदेशी कलाप्रकारांचे कालातीत सौंदर्य दर्शवतात.

हे प्रदर्शन 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत गुजरातच्या केवडिया, एकता नगर येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.

***

शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330762) अभ्यागत कक्ष : 24