कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या न्यायिक, तांत्रिक सदस्यांच्‍या नियुक्‍ती प्रक्रियेत केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची केवळ प्रशासनिक भूमिका

Posted On: 30 OCT 2026 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणातील (एनसीएलटी) कर्मचारीविषयक बाबींशी संबंधित काही बातमी अहवालांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि एनसीएलटी यांच्या संबंधित भूमिकांकडे, त्यांना सोपवण्यात आलेल्या स्वतंत्र जबाबदाऱ्यांच्या संदर्भात पाहता येईल.

एनसीएलटीच्या 63 न्यायिक तसेच तांत्रिक सदस्यांची नेमणूक प्रक्रिया राबवताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय केवळ प्रशासनिक भूमिका निभावते.

एनसीएलटी उप-निबंधक, न्यायालय अधिकारी, लघुलेखक, कार्यालयीन मदतनीस तसेच विविध कामे करणारा कर्मचारीवर्ग (मल्टी-टास्किंग स्टाफ) यांच्यासह न्यायाधिकरणाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी यांची नेमणूक तसेच व्यवस्थापन प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडते. एनसीएलटीचे कार्य प्रभावीपणे तसेच स्वतंत्रपणे होण्याची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने, दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही जबाबदारी एनसीएलटीकडे सोपवण्‍यात आली आहे.

 

 सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2330648) अभ्यागत कक्ष : 7