राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती, सी. पी. राधाकृष्णन यांनी युरोपीय संसदेच्या परराष्ट्र व्यवहार विषयक समितीची घेतली भेट

Posted On: 28 OCT 2026 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026

 

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती, सी. पी. राधाकृष्णन यांनी आज, डेव्हिड मॅकलिस्टर यांच्या नेतृत्वाखालील, युरोपीय संसदेच्या परराष्ट्र व्यवहार विषयक समितीची नवी दिल्लीत संसद भवन इथे भेट घेतली.  गेल्या काही वर्षांत भारत-युरोपीय संघ यांच्यातील संबंधांमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. हे संबंध पुढे नेण्यासाठी भारत आणि युरोपीय संघाच्या नेतृत्वाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाचे उपराष्ट्रपतींनी आभार मानले.

   

दोन्ही देशातील संबंधांचा सामायिक पाया आहे, असे अधोरेखित करत, दोन्ही सर्वात मोठ्या लोकशाही आणि मुक्त बाजारपेठ असलेल्या अर्थव्यवस्था आहेत, तसेच, दोन्हीकडे अत्यंत विविधांगी आणि बहुलतावादी समुदाय आहेत, असे ही ते म्हणाले. बहूध्रुवीय, लवचिक अशा जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात भारत आणि युरोपीय महासंघालाही विशेष रस आहे, असे त्यांनी सांगितले. युरोपीय संघाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लेयेन यांच्या नेतृत्वाखाली 2025 मध्ये युरोपीय आयुक्त मंडळाने (College of Commissioners) भारताला दिलेल्या भेटीनंतर, सरकारी यंत्रणेच्या सर्वंकष दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या संबंधांचे आता सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.

या उच्चस्तरीय भेटींचे स्मरण करत, राधाकृष्णन यांनी सांगितले की,  युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष भारतात यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारत- युरोपीय महसंघांच्या 16 व्या शिखर परिषदेत त्यांच्या उपस्थितीने, या भागीदारीला प्रचंड गती मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

व्यापार आणि गुंतवणूक यावर भर देत, राधाकृष्णन यांनी भारत आणि युरोपीय महासंघ मिळून, जगातील सुमारे 25 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे आणि सुमारे दोन अब्ज लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. प्रस्तावित मुक्त व्यापार करार, हा सर्व करारांची माता असल्याचे नमूद करत, राधाकृष्णन यांनी, हा करार या वर्षात अस्तित्वात येईल आणि त्यासाठी, युरोपीय संसदेचे आवश्यक पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष यातील सहकार्याविषयी बोलयांना, सी.पी. राधाकृष्णन यांनी, भारत – ईयू व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेने, उच्चस्तरीय धोरणात्मक सहकार्यात दिलेल्या महत्वाच्या योगदानाची प्रशंसा केली. तसेच,अत्यंत प्रतिष्ठित अशा होरायझन युरोप कार्यक्रमात, भारताच्या सहभागाविषयीच्या वाटाघाटी, यशस्वीपणे संपल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

तसेच, या भेटीत स्पेन मध्ये आज झालेल्या अत्यंत दु:खद अशा रेल्वे अपघाताबद्दल उपराष्ट्रपतींनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

राज्यसभेचे सदस्य संजय कुमार झा (भारत-जर्मनी संसदीय मैत्री गटाचे अध्यक्ष), सुरेंद्र सिंह नागर (भारत-पोलंड संसदीय मैत्री गटाचे अध्यक्ष), अमर पाल मौर्य (भारत-पोलंड संसदीय मैत्री गटाचे अध्यक्ष) आणि पी. टी. उषा (भारत-जर्मनी संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्ष) हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329835) अभ्यागत कक्ष : 9