सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून ‘नशा मुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजुषा ’ स्पर्धेचे आयोजन

Posted On: 26 OCT 2026 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत, अंमली पदार्थ सेवन आणि व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने, तसेच, नागरिक, विशेषतः तरुणांना नशा- मुक्त भारत घडवण्याच्या मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या हेतूने, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने, ‘नशा मुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजुषा ’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

माय भारत क्विझ क्यू आर

ही ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, 26 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणार असून ती सर्वांसाठी खुली असल्याची माहिती, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व इच्छुक, माय भारत पोर्टल वर खालील लिंक वर क्लिक करुन, या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

https://mybharat.gov.in/quizzes/yuva/detail/Url9dlIwCinQVSf8lwPB9w/

15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या नशामुक्त भारत अभियानाचा उद्देश, प्रतिबंधात्मक माहिती, जनजागृती, उपचार, पुनर्वसन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला चाप लावण्यासाठीचे प्रयत्न अधिक बळकट करणे हा आहे. सुरुवातीला 272 अधिक प्रभावित आणि संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा विस्तार, आता देशातील सर्व जिल्ह्यांपर्यंत करण्यात आला आहे.

ही मोहीम, आतापर्यंत 35 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यात आली असून, त्यात 13 कोटी युवक आणि 10 कोटी महिलांचा समावेश आहे. यावरून, देशभरात राबवण्यात येणाऱ्या जनजागृती आणि जनसंपर्क उपक्रमांची व्यापकता दिसून येते, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

नशा मुक्ती मित्र नोंदणी क्यू आर कोड

या अभियानाचे हे सातवे वर्ष असल्याने, या प्रश्नमंजुषा स्पर्धेत, अंमली पदार्थांच्या सेवनाचे भयंकर दुष्परिणाम लोकांसमोर आणणे, लोकांना नीट माहिती देऊन, त्या आधारावर त्यांना निर्णयप्रकीयेसाठी जागृत करणे आणि अंमली पदार्थांच्या सेवनालाच प्रतिबंध व्हावा, यासाठी जनजागृतीमध्ये सहभागी होणे, यासाठी युवकांना प्रोत्साहन दिले जात आहे.

या उपक्रमामुळे, नशामुक्त भारत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या संकल्पाला बळ मिळेल. देशाच्या विकासासाठी निरोगी व्यक्ती, कुटुंबे आणि समुदाय यांचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित होते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रश्नमंजुषेत 20 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतील. हे प्रश्न सोडविण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी दिला जाईल.

प्रश्नमंजुषा पूर्ण करून उत्तरे सादर करणाऱ्या प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रश्नमंजुषा पूर्ण झाल्यानंतर सहभागींना योग्य उत्तरेही पाहता येतील. त्यामुळे त्यांना व्यसन प्रतिबंधाविषयीची आपली समज अधिक दृढ करता येईल.

एनएमबीए मोबाईल अॅप

या उपक्रमाच्या माध्यमातून, मंत्रालयाचा हेतू, या मोहिमेत समुदायाचा सहभाग वाढवणे, जबाबदार निवडीला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांना, विशेषत: युवकांना अंमली पदार्थ सेवन मोहिमेचे सदिच्छादूत होण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

या प्रश्नमंजुषेअंतर्गत, नशा मुक्त भारत अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा डिजिटल प्लॅटफॉर्म नागरिकांना उपलब्ध होईल आणि ते ही एका निरोगी समाजासाठी योगदान देऊ शकतील.

एनएमबीए ई-प्रतिज्ञा क्यू आर कोड

‘नशामुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजुषा’मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि नशामुक्त भारताच्या दिशेने सुरू असलेल्या सामूहिक चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2328786) अभ्यागत कक्ष : 7