Posted On:
25 OCT 2026 11:42AM by PIB Mumbai
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई) आपल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह (सीपीएसयू) आणि स्वायत्त संस्थांसह विशेष अभियान 6 ची सक्रियपणे अंमलबजावणी करत आहे.
मंत्रालय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी सुमारे 60-70% प्रगती साध्य केली आहे. स्वच्छता, अभिलेखांचे कार्यक्षम व्यवस्थापन, कार्यालयीन जागेचा सर्वोत्तम वापर आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या अभियानांतर्गत कार्यालये, दालने आणि उपाहारगृहांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणे, भौतिक अभिलेखांचा आढावा घेऊन अनावश्यक अभिलेख काढून टाकणे, निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावणे, तसेच लागू मार्गदर्शक तत्त्वांनुसार ई-कचऱ्याची ओळख करून त्याची विल्हेवाट लावणे, या प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे.
मंत्रालयासह त्याचे 2 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (आयआरईडीए) अर्थात भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित आणि सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसईसीआय) अर्थात भारतीय सौर ऊर्जा महामंडळ मर्यादित, तसेच 3 स्वायत्त संस्था — राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (एनआयएसई), राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्था (एनआयडब्लूई) आणि सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैवऊर्जा संस्था (एसएसएस-एनआयबीई) या अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहेत.
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) सुरू केलेल्या या अभियानाचा उद्देश सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेची संस्कृती संस्थात्मक स्वरूपात रुजवणे आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करणे हा आहे. या अभियानाचा अंमलबजावणी टप्पा 2 आॅक्टोबर 2026 रोजी सुरू झाला असून तो 31 आॅक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.
31 ऑक्टोबर 2026 पर्यंत निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि अभियानाचा कालावधी संपल्यानंतरही स्वच्छता, उत्तरदायित्व आणि कार्यस्थळाच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची संस्कृती कायम राखण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.


***
हर्षल अकुडे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai