पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून जेहान दोराब मदन आणि शुभम वाधवा यांचे अभिनंदन

Posted On: 23 OCT 2026 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी एमडी4 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेहान दोराब मदन आणि शुभम वाधवा यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेमध्‍ये  या प्रकारात भारताने प्रथमच पदक जिंकले असून, त्यांच्या या यशामुळे ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. यापुढेही त्यांनी असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्‍यम ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी एमडी4 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल जेहान दोराब मदन आणि शुभम वाधवा यांचे अभिनंदन! या स्पर्धेत या प्रकारात भारताने प्रथमच पदक जिंकले आहे. या दोघांना यापुढील अनेक यशांसाठी शुभेच्छा. : पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327714) अभ्यागत कक्ष : 5