Posted On:
22 OCT 2026 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिला एकेरी एसएल3 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपली छाप पाडल्याबद्दल संजना कुमारीचे अभिनंदन केले.
आपल्याला संजनाच्या या कामगिरीचा अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भविष्यातही तिने अशीच उत्कृष्ट कामगिरी करत रहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"संजना कुमारीने आशियाई पॅरा गेम्समध्ये आपली छाप पाडली! महिला एकेरी एसएल3 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल आपल्याला तिचा अभिमान आहे. भविष्यातही तिने अशीच उत्कृष्ट कामगिरी करत रहावे: PM @narendramodi”
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai