Posted On:
22 OCT 2026 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायल संबंधांमध्ये दिसून येत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचे स्वागत केले आणि या दोन्ही देशांदरम्यान असलेली विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासंदर्भातील सामायिक कटिबद्धतेला दुजोरा दिला.
यावेळी या नेत्यांनी पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींबाबत आपापले विचार मांडले आणि त्या भागात शांतता तसेच स्थैर्य प्रस्थापित करण्याची निकड अधोरेखित केली.
संवाद आणि राजकीय मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा मार्ग असल्याच्या भारताच्या आवाहनाचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
* * *
राधिका अघोर/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai