पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2026–27 च्या पहिल्या सहामाहीत भारताच्या पोलाद क्षेत्राने नोंदवली भक्कम वाढ

Posted On: 06 OCT 2026 12:03PM by PIB Mumbai

1. पोलाद उत्पादन आणि किंमती


1a.उत्पादनाचा आढावा (दशलक्ष टनांमध्ये)

Production

Sep 2026

Sep 2025

YoY %

Apr-Sep
2026

Apr-Sep
2025

CPLY %

Crude Steel

14.1

13.7

3.4

85.1

82.7

2.9

Hot Metal

7.9

7.9

0.2

48.3

47.2

2.5

Finished Steel

13.5

13.2

1.9

81.8

78.8

3.7

1b. उत्पादक- निहाय उत्पादन (एप्रिल-सप्टेंबर 2026) (मेट्रिक टनामध्ये)

Producer

Annual Crude
Steel
Capacity

Crude Steel
Production

Hot Metal
Production

Finished
Steel
Production

Top 7

117.4

47.7

44.8

44.1

Remaining producers

105.4

37.4

3.5

37.7

TOTAL

222.9

85.1

48.3

81.8

Public Sector Share (%)

13.9

15.5

29.4

13.5

Top 7 includes SAIL, RINL, NSL, TSL Group, AM/NS, JSL(JSPL), JSW Group

1c. पोलादाच्या किंमती  (₹/टन मध्ये)

Product

Jul-26

Aug-26

Sep-26

MoM %

YoY %

TMT (10 mm)

₹ 56,698

₹ 58,002

₹ 65,298

12.6%

21.0%

HR Coil (2 mm)

₹ 69,828

₹ 70,448

₹ 76,085

8.0%

26.8%

CR Coil (0.63 mm)

₹ 76,582

₹ 76,462

₹ 84,972

11.1%

28.8%

GP Sheet (0.63 mm)

₹ 86,415

₹ 86,668

₹ 94,148

8.6%

27.7%

Note: Prices are inclusive of GST and shown in ₹/tonne, based on average prices from four metro cities—Kolkata, Delhi, Mumbai, and Chennai.


2. मागणी (दशलक्ष टनांमध्ये)

Indicator

Sep 2026

Sep 2025

YoY %

Apr-Sep
2026

Apr-Sep
2025

CPLY %

Finished Steel
Consumption

14.4

13.3

8.0

84.9

79.0

7.5

 

3. व्यापार गतिशीलता


3a. तयार पोलाद — आयात आणि निर्यात

Indicator

Unit

Sep-26

Sep-25

YoY %

Apr-Sep
2026

Apr-Sep
2025

CPLY %

Imports

'000 t

654.4

651.9

0.4

4141.8

3344.8

23.8

Rs Crore

7496.2

5032.9

48.9

43690.1

31205.4

40.0

Exports

'000 t

561.8

584.0

-3.8

3547.8

2810.2

26.2

Rs Crore

4617.1

4020.4

14.8

28263.7

21931.5

28.9

Net Trade
Position

India was net importer of finished steel in terms of quantity for the period of Apr-Sep 2026

4. कच्चा माल


4a. देशांतर्गत कच्च्या मालाचे दर (₹/टन)

Commodity

Jul 2026

Aug 2026

Sep 2026

MoM Change

NMDC Iron Ore Baila Lump
(65.5%, 10-40 mm)

₹ 5,450

₹ 5,250

₹ 5,400

2.9%

NMDC Iron Ore Baila Fines
(64%, 0-10 mm)

₹ 4,700

₹ 4,500

₹ 4,500

-

MOIL Manganese Ore Lump (Mn
37%, Fe 7.5%)

₹ 18,530

₹ 17,603

₹ 17,603

-

Scrap — HMS II

₹ 38,580

₹ 39,970

₹ 43,810

9.6%

5. प्रमुख निर्देशांक


Index

Jul 2026

Aug 2026

Sep 2026

MoM
Change

YoY
Change

Nifty Metal Index (avg.)

12,556.4

13,181.8

13,053.7

-1.0%

32.7%

PMI Manufacturing Index

53.5

52.8

55.1

4.4%

-4.5%

Baltic Dry Index (avg.)

2,769.9

2,951.1

3,407.7

15.5%

60.4%

Source: NSE, S&P Global, Trading Economics

 6. धोरणात्मक उपक्रम / उद्योग क्षेत्रातील उपक्रम


पोलाद उद्योगात सुरक्षा मानके, अपघात प्रतिबंध आणि सुरक्षा  संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी, पोलाद मंत्रालयाने 'स्टील इंडस्ट्री सेफ्टी कौन्सिल' (SISC) नावाची सर्वोच्च समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे; ज्याच्या अध्यक्षस्थानी  पोलाद मंत्रालयाचे सचिव असतील. 'स्टील इंडस्ट्री सेफ्टी डिरेक्टोरेट' (SISD) हे एक समर्पित संचालनालय या समितीला सुरक्षा लेखापरीक्षण, गंभीर घटनांची चौकशी आणि भारतीय परिस्थितीला अनुकूल  सुरक्षा मानके जारी करणे यांमध्ये सहाय्य करेल ; ज्यांच्या कक्षेत लोखंड व पोलाद उत्पादक तसेच केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (CPSE) खाणींचा समावेश असेल.

एनएमडीसी (NMDC) ने छत्तीसगडमधील नगरनार येथे आपला 2 MTPA क्षमतेचा पेलेट प्रकल्प कार्यान्वित करून 5,427 कोटी रुपयांचा एकात्मिक प्रकल्प पूर्ण केला आहे. या प्रकल्पामध्ये बचेली येथील लोहखनिज प्रक्रिया प्रकल्प,135- किमी लांबीची 15 MTPA  क्षमतेची स्लरी पाइपलाइन आणि 'स्ट्रेट ग्रेट इंड्युरेशन' तंत्रज्ञानाचा वापर करणारा नगरनार पेलेट प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे बैलाडिला येथील लोहखनिजाचे बारीक कण (fines) आणि स्लाइम्स (slimes) यांच्यापासून मूल्यवर्धन करणे शक्य होईल, खनिजाची रस्तेमार्गे होणारी वाहतूक कमी होईल आणि लोहखनिज मूल्य साखळीमध्ये एनएमडीसीचे चे अस्तित्व अधिक मजबूत होईल.

सप्टेंबर  2026, मध्ये एनएमडीसीचे लोहखनिज उत्पादन वर्ष-दर-वर्ष  8% ने  वाढून 4.04 दशलक्ष टन झाले, ज्यामुळे आर्थिक वर्ष 2026–27 च्या पहिल्या सहामाहीतील उत्पादन  27.3 दशलक्ष टन झाले, जे आर्थिक वर्ष 2025–26 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत जवळपास 23% नी अधिक  असून  कंपनी आपल्या वार्षिक उत्पादन लक्ष्यांच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सेल (SAIL) आणि भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) यांनी पश्चिम बंगालमधील सेलच्या इंडिकट्टा रामनगर कोळसा ब्लॉक आणि बीसीसीएलच्या ईस्ट ऑफ दामागोरिया (कल्याणेश्वरी) कोळसा ब्लॉकच्या संयुक्त विकास आणि संचालनासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ही भागीदारी दोन्ही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील सहकार्य अधिक मजबूत करते आणि देशांतर्गत कोकिंग कोळशाच्या स्रोतांच्या विकासाला पाठिंबा देते.

सेलच्या रुरकेला स्टील प्लांट ने हॉट स्ट्रिप मिल-2 येथे एक इन -हाऊस  एआय-आधारित सुरक्षा देखरेख  प्रणाली कार्यान्वित केली आहे. या  प्रणालीत  हेल्मेटच्या नियमांचे उल्लंघन शोधण्यासाठी आणि स्वयंचलित अलार्म वाजवण्यासाठी 10 आयपी कॅमेरे आणि कॉम्प्युटर व्हिजनचा वापर केला आहे.  यात वेळ नोंदवलेल्या घटनांचीही नोंद होते .  याच्या पुढील टप्प्यांमध्ये यात पीपीई नियमांचे इतर उल्लंघन, असुरक्षित कृत्ये, आग आणि इतर धोक्यांचाही समावेश केला जाईल. 

7.  'ग्रीन स्टील' (पर्यावरण-स्नेही  पोलाद) उपक्रम


पोलाद मंत्रालयाच्या 'ग्रीन स्टील' उपक्रमांतर्गत, सप्टेंबर 2026 पर्यंत जारी करण्यात आलेल्या याद्यांनुसार  101 विविध पोलाद उत्पादकांना 'ग्रीन स्टील प्रमाणपत्रे' प्रदान करण्यात आली आहेत. या प्रमाणपत्रांच्या कक्षेत टीएमटी  बार्स, एचआर/सीआर  कॉइल्स, प्लेट्स, वायर रॉड्स, पाईप्स आणि इतर पोलाद उत्पादनांचा समावेश आहे. प्रमाणित उत्पादनांपैकी बहुतांश उत्पादनांना '5-स्टार' मानांकन मिळाले आहे, जे भारतातील पोलाद उद्योगात कमी उत्सर्जन करणाऱ्या उत्पादन पद्धतींचा वाढता अवलंब दर्शवते.

जाधवपूर विद्यापीठ हे 'सेल' (SAIL), 'डीव्हीसी' (DVC) आणि 'एचयूआरएल' (HURL) यांच्या सहकार्याने 'ग्रीन हायड्रोजन' संशोधनासाठी 8.18 कोटी रुपये खर्चाचे 'उत्कृष्टता केंद्र' उभारणार आहे. 'नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालया'ने मंजूर केलेल्या चार केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे. 'सेल' आपल्या सुविधा केंद्रांवर विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची चाचणी आणि अंमलबजावणी करेल; याद्वारे 'राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन' अंतर्गत पोलाद, ऊर्जा आणि खत निर्मितीमध्ये ग्रीन हायड्रोजनच्या वापराला  चालना मिळेल.

***

NehaKulkarni / SushamaKane/ DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326449) अभ्यागत कक्ष : 25