पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नम्रता आणि सातत्याने अध्ययनाच्या महत्त्वावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 22 OCT 2026 7:49AM by PIB Mumbai

मर्यादित यशाचा अहंकार न बाळगता नम्र राहून सातत्याने शिकत राहण्याचे आणि प्रगती करण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहेः 

"खद्योतो द्योतते तावद् यावन्नोदयते शशी।

उदिते तु सहस्रांशौ न खद्योतो न चन्द्रमाः।।"

काजवा केवळ चंद्राचा उदय होईपर्यंतच चमकताना दिसतो. परंतु जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा काजव्याचा प्रकाश आणि चंद्र दोन्ही दृश्यमान राहत नाहीत. त्याचप्रमाणे, एखाद्या लहान यशाचे महत्त्व केवळ मोठे यश मिळेपर्यंतच असते. म्हणूनच, मर्यादित यशावर अहंकार न करता माणसाने नम्र राहिले पाहिजे आणि सतत शिकत पुढे जात राहिले पाहिजे.

***

NehaKulkarni / ShaileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326428) अभ्यागत कक्ष : 11