पंतप्रधान कार्यालय
प्रभू श्रीराम हे सदाचाराचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषितातून अधोरेखित केले
Posted On:
20 OCT 2026 11:33AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संस्कृत सुभाषित सामायिक केले. या सुभाषितातून प्रभू श्रीराम हे सदाचाराचे, सत्य आणि शौर्य यांचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे अधोरेखित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर म्हटले आहे की,
"रामो विग्रहवान् धर्मस्साधुस्सत्यपराक्रमः।
राजा सर्वस्य लोकस्य देवानां मघवानिव॥
प्रभू श्रीराम हे धर्म आणि सदाचाराचे प्रतीक आहेत. ते सज्जनांचे रक्षण करतात. आपल्या संकल्पांवर ठाम राहतात आणि सत्याच्या मार्गावर चालत शौर्य दाखवतात. ज्याप्रमाणे इंद्रदेव स्वर्गाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम संपूर्ण विश्वाचे रक्षण करतात आणि त्याचा कारभार सांभाळतात.
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325388)
अभ्यागत कक्ष : 9