संरक्षण मंत्रालय
लोकायन 2026 – भारतीय नौदलाचे जहाज सुदर्शिनी ओमानमधील सलालाह येथून रवाना
Posted On:
18 OCT 2026 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2026
भारतीय नौदलाचे तीन डोलकाठ्यांचे प्रशिक्षण नौकानयन जहाज आयएनएस सुदर्शिनी, 14 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ओमानमधील सलालाह येथे मुक्काम केल्यानंतर तेथून रवाना झाले. या जहाजाचा ऐतिहासिक महासागरी प्रवास ‘लोकायन-2026’ अंतर्गत सुरू आहे. हा प्रवास भारतीय नौदलाचा समृद्ध सागरी वारसा तसेच नौदलातील प्रशिक्षणार्थींमध्ये व्यावसायिक नौकानयन कौशल्य, प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित करतो.
सलालाह येथील मुक्कामादरम्यान व्यावसायिक संवाद आणि क्रीडा उपक्रमांमुळे भारतीय नौदल आणि ओमानची रॉयल नेव्ही यांच्यात सौहार्द वाढले आणि मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले. यामुळे दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंधही अधिक बळकट झाले.
‘लोकायन-2026’ या मोहिमेचा दहावा महिना सुरू असताना, आयएनएस सुदर्शिनीचा प्रवास भारतीय नौदलाची शोधक वृत्ती, व्यावसायिक उत्कृष्टता आणि सागरी राजनयाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करतो. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातून प्रवास करताना हे जहाज भारताचा सदिच्छादूत म्हणून कार्य करते. याद्वारे सद्भावना आणि सागरी भागीदारीला प्रोत्साहन दिले जाते. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत आणि ‘महासागर’ (विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर व सर्वांगीण प्रगती) या संकल्पनेला पुढे नेत हे जहाज भारताची जागतिक बांधिलकी अधोरेखित करते.
_20261018185431_a0a541.jpeg)
_20261018185351_d64f4b.jpeg)
_20261018185410_a028ed.jpeg)
* * *
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324972)
अभ्यागत कक्ष : 9