संरक्षण मंत्रालय
परस्परांच्या सागरी सहकार्याला बळकटी देण्यासाठी पहिली भारतीय प्रशिक्षण तुकडी सेशेल्सहून मायदेशी परतीच्या प्रवासासाठी रवाना
Posted On:
17 OCT 2026 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2026
भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण पथकातील (1TS) जहाजे — आयएनएस तीर, आयएनएस सुजाता आणि भारतीय तटरक्षक दलाचे जहाज सारथी आपला प्रशिक्षण मोहिमेदरम्यानचा,12 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झालेला आपला मुक्काम पूर्ण करून, 15 ऑक्टोबर 2026 रोजी सेशेल्सच्या पोर्ट व्हिक्टोरिया येथून परतीच्या प्रवासाला निघाली आहेत. या उपक्रमामुळे व्यावसायिक प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि देशाचे नेतृत्व व सागरी समुदायासोबतच्या संवादासह भारत-सेशेल्सच्या दीर्घकालीन भागीदारीला अधिक बळकटी मिळाली आहे.
या बंदरावरील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, भेट देणाऱ्या जहाजांच्या कमांडिंग ऑफिसर्ससोबत, सेशेल्स डिफेन्स फोर्सचे (SDF) संरक्षण दल प्रमुख मेजर जनरल मायकल रोसेट यांची भेट घेतली. तेथे झालेल्या चर्चेत दोन्ही दलांमधील चिरस्थायी भागीदारी आणि द्विपक्षीय सहकार्य यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात व्यावसायिक उपक्रम त्याचप्रमाणे SDF जवानांना अग्निशमन आणि लहान शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही देण्यात आले.पहिल्या प्रशिक्षण स्क्वाड्रनने सेशेल्स कोस्ट गार्ड शिप अँड्रोमाचे यांच्यासह एक पॅसेज एक्सरसाइज (PASSEX) देखील आयोजित केला होता, ज्यामध्ये संयुक्त गस्त, दळणवळण सराव आणि समन्वित कवायतींचा समावेश होता.जनप्रसारार्थ झालेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये एक वैद्यकीय शिबिर, पॉईंट ला रु येथील वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शाळकरी मुलांची भेट आणि भारतीय नौदल बँडचा संगीत कार्यक्रम यांचा समावेश होता.
या प्रशिक्षण तैनातीमुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातील मैत्रीचे दृढ संबंध अधोरेखित झाले असून आणि 'महासागर' (सर्व प्रदेशांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती,MAHASAGAR ) या संकल्पनेनुसार क्षमता बांधणी आणि प्रादेशिक भागीदारीप्रती भारतीय नौदलाची असलेली वचनबद्धता दिसून येते
_20261017185118_01c63c.jpeg)
_20261017185133_132188.jpeg)
_20261017185205_59a949.jpeg)
_20261017185216_dcb2f5.jpeg)
* * *
राधिका अघोर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324823)
अभ्यागत कक्ष : 8