संरक्षण मंत्रालय
‘एक्सरसाइज कोकण-26’ या युद्धसरावाची युनायटेड किंगडममधील प्लायमाउथ किनारपट्टीवर सांगता
Posted On:
17 OCT 2026 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2026
'कोंकण-26' (KONKAN-26) हा भारत आणि ब्रिटन (UK) दरम्यानचा द्विपक्षीय सागरी युद्धसराव 15 ऑक्टोबर 2026 रोजी युकेमधील प्लायमाउथ किनाऱ्याजवळ यशस्वीरीत्या पार पडला. 8 ते 15 ऑक्टोबर 2026 या काळात पार पडलेल्या या सरावामुळे भारतीय नौदल आणि रॉयल नेव्हीला व्यावसायिक तसेच प्रातिनिधिक-कार्यपद्धतींच्या (operational domains) विस्तीर्ण क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळाली.
या सरावात भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व 'आयएनएस त्रिशूल' (INS Trishul) या स्टील्थ फ्रिगेट युद्धनौकेने केले, तर रॉयल नेव्हीकडून 'एचएमएस सदरलँड' (HMS Sutherland) ही 'ड्यूक-क्लास' पाणबुडीविरोधी फ्रिगेट युद्धनौका सहभागी झाली होती. या संपूर्ण सरावाचे आयोजन रॉयल नेव्हीच्या 'फ्लीट ऑपरेशनल स्टँडर्ड्स अँड ट्रेनिंग' (FOST) द्वारे करण्यात आले होते.
12 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान चाललेल्या चार दिवसांच्या अत्यंत तीव्र 'सी फेज' (समुद्रावरील टप्पा) दरम्यान प्रगत सागरी हालचाली, संयुक्त धोरणात्मक युद्धसराव, संवाद व संपर्क कार्यपद्धती, असिमेट्रिक अँटी-सरफेस वॉरफेअर, पाणबुडीविरोधी युद्धसराव आणि बहु-धोक्यांनी वेढलेल्या सागरी वातावरणात शस्त्रास्त्रांचा मारा करण्याचे प्रात्यक्षिक यांसारख्या विविध सत्रांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांमुळे दोन्ही सैन्यांतील परस्पर सहकार्य व सामंजस्य अधिक मजबूत झाले.
व्यावसायिक कौशल्ये आणि उत्कृष्ट कार्यपद्धतींच्या या देवाणघेवाणीतून 'कोंकण-26' सरावाने भारतीय नौदल आणि रॉयल नेव्हीची जटिल सागरी आव्हानांना संयुक्तपणे तोंड देण्याची क्षमता अधिक दृढ केली, तसेच भारत आणि ब्रिटनमधील प्रदीर्घ सागरी भागीदारीला नव्याने गती दिली.
_20261017210823_096ebc.jpeg)
_20261017210835_945f89.jpeg)
_20261017210847_8d6062.jpeg)
_20261017210859_3bf54f.jpeg)
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324822)
अभ्यागत कक्ष : 7