राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक क्षेत्राजवळ कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी झिरपून विंधन विहीरीतील पाणी प्रदूषित झाल्याच्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून स्वतःहून दखल
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी, या प्रकरणी दोन आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाही उत्तर देण्याची सूचना
Posted On:
16 OCT 2026 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अंबड औद्योगिक क्षेत्राजवळ दत्तनगर परिसरातील विंधन विहीरीतील पाणी प्रदूषित झाल्याच्या माध्यमांमधील वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे. जवळच्या औद्योगिक क्षेत्रातल्या कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पाणी दुषित झाल्याचे यात म्हटले असून गेले दोन महिने येथील रहिवाशांना दूषित पाणी मिळत असल्याचेही म्हटले आहे.
माध्यमांमधील वृत्त खरे असेल तर तो मानवाधिकार उल्लंघनाचा गंभीर मुद्दा असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले असून आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी दोन आठवड्यांमध्ये सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या घटनेबाबत आपले उत्तर सादर करावे असे आयोगाने म्हटले आहे.
7 ऑक्टोबर 2026 रोजीच्या माध्यमांमधील वृत्तानुसार मुलांना शाळेत न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या भागातील नागरिक पिण्याचे स्वच्छ पाणी खरेदी करण्यासाठी दरमहा सुमारे 5000 रुपये खर्च करत आहेत, शिवाय वैद्यकीय उपचारांसाठीदेखील मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे.
* * *
निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324543)
अभ्यागत कक्ष : 15