वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सप्टेंबर 2026 साठी घाऊक किंमत निर्देशांक, उत्पादन किंमत निर्देशांक आणि चाचणी निविष्ठा उत्पादक किंमत निर्देशांकाची तात्पुरती आकडेवारी जाहीर; जुलै 2026 चा अंतिम निर्देशांकही प्रसिद्ध

Posted On: 14 OCT 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026

1. सप्टेंबर 2026 साठी घाऊक किंमत निर्देशांकाची  ठळक वैशिष्ट्ये (आधार वर्ष 2022-23)

1. सप्टेंबर 2026 मध्ये अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर मागील वर्षाच्या तुलनेत  11.39 टक्के नोंदवण्यात आला. ऑगस्ट 2026 मध्ये हा दर 9.92 टक्के होता. सप्टेंबर 2026 मध्ये सर्व वस्तूंचा निर्देशांक 112.5 होता, तर ऑगस्ट 2026 मध्ये तो 110.8 होता.

2. अन्नधान्य  किंमत निर्देशांक (भारांकन = 24.99 टक्के): या निर्देशांकात प्राथमिक वस्तू या प्रमुख गटातील ‘अन्नपदार्थ’ आणि उत्पादित वस्तू या प्रमुख गटातील ‘अन्नपदार्थांचे उत्पादन’ यांचा समावेश होतो. सप्टेंबर 2026 मध्ये या निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाईचा दर 8.66 टक्के नोंदवण्यात आला. ऑगस्ट 2026 मध्ये तो 7.05 टक्के होता.

3. सर्व वस्तू आणि प्रमुख गटांचे मासिक निर्देशांक
आणि महागाईचे दर (टक्क्यांमध्ये), तसेच गेल्या महिन्यांतल्या प्रमुख गटांचे महागाईतले योगदान खालील आलेखांमध्ये दर्शवण्यात आले आहे.

आलेख 1: सर्व वस्तूंचा घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाईचा दर

आलेख 2: प्रमुख गटांचे घाऊक किंमत निर्देशांक

आलेख 3: प्रमुख गटांनुसार महागाईचा दर

आलेख 4: महागाईत प्रमुख गटांचे योगदान

2. जुलै 2026 चा अंतिम निर्देशांक तात्पुरत्या निर्देशांकाप्रमाणेच 110.0 वर कायम आहे. त्यानुसार, जुलै 2026 साठी घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा अंतिम दरही 9.78 टक्के इतका कायम आहे.

सप्टेंबर 2026 साठी  उत्पादन किंमत निर्देशांकाचे  तात्पुरते अंदाज

(आधार वर्ष 2022-23)

1. सप्टेंबर 2026 साठी  उत्पादन किंमत निर्देशांकाची ठळक वैशिष्ट्ये

1. सप्टेंबर 2026 मध्ये सर्व वस्तूंसाठीचा अखिल भारतीय उत्पादन किंमत निर्देशांक 112.5 नोंदवण्यात आला. ऑगस्ट 2026 मध्ये तो 110.8 होता.

2. सप्टेंबर 2026 मध्ये कृषी, वनीकरण आणि मत्स्यव्यवसाय, खाणकाम आणि उत्खनन, उत्पादित वस्तू आणि वीज या क्षेत्रांचे उत्पादक किंमत निर्देशांक अनुक्रमे 118.7, 129.2, 111.0 आणि 92.0 होते. ऑगस्ट 2026 मध्ये हे निर्देशांक अनुक्रमे 116.5, 122.0, 109.7 आणि 90.9 होते.

3. गेल्या 13 महिन्यांतल्या सर्व वस्तू आणि प्रमुख गटांचे मासिक निर्देशांक खालील आलेखांमध्ये दर्शवण्यात आले आहेत.

 सप्टेंबर 2026 साठी चाचणी निविष्ठा उत्पादक किंमत निर्देशांकाचे  तात्पुरते अंदाज

(आधार वर्ष 2022-23)

1. सप्टेंबर 2026 मध्ये उत्पादन क्षेत्रासाठीचा अखिल भारतीय चाचणी निविष्ठा उत्पादक किंमत निर्देशांक (1)106.1 इतका नोंदवण्यात आला आहे. हा तात्पुरता निर्देशांक आहे.

2. उत्पादन क्षेत्रासाठी जुलै 2026 चा चाचणी निविष्ठा उत्पादक किंमत निर्देशांक यापूर्वीच्या 105.9 या तात्पुरत्या आकडेवारीवरून सुधारित करून 105.5 इतका अंतिम करण्यात आला आहे.

3. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीतील राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाच्या (NIC) 2 अंकी स्तरावरच्या सर्व उत्पादन उद्योगांचा चाचणी निविष्ठा उत्पादक किंमत निर्देशांक खाली दिला आहे.

 

सुषमा काणे /निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2323376) अभ्यागत कक्ष : 11