पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारमधील वैशाली येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख


सानुग्रह निधी देण्याची पंतप्रधानांनी केली घोषणा

Posted On: 13 OCT 2026 11:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील वैशाली येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या कठीण काळात शोकाकुल कुटुंबांप्रती पंतप्रधानांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि सर्व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो यासाठी प्रार्थना केली. तसेच, स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ज्यांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या निकटच्या नातेवाईकांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'तून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल. तसेच, जखमींना 50,000 रुपये  रक्कम दिली जाईल,असे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये  लिहिले आहे;

“बिहारमधील वैशाली येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करत आहे. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे.

प्राण गमावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील:

@पंतप्रधान नरेंद्र मोदी”

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2323348) अभ्यागत कक्ष : 9