आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कर्मयोगी भारत यांनी आदि कर्मयोगी स्वयंसेवकांसाठी आयजीओटी कर्मयोगी शिक्षण मंच आणण्याकरिता सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
आयजीओटी च्या आदि कर्मयोगी मायक्रोसाईटद्वारे आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कर्मयोगी भारत एकत्र आले
तळागाळातील नेतृत्वाची उभारणी: देशभरातील आदि कर्मयोगी स्वयंसेवकांना प्रशिक्षित आणि प्रमाणित करण्यासाठी समर्पित आयजीओटी मंच
Posted On:
13 OCT 2026 6:29PM by PIB Mumbai
आदिवासी विकासासाठी गावपातळीवरील स्वयंसेवकांचा एक प्रशिक्षित आणि प्रमाणित गट तयार करण्याकरिता एक समर्पित एकेव्ही मायक्रोसाईट. आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कर्मयोगी भारत यांनी आज नवी दिल्ली येथे आयजीओटी कर्मयोगी चौकटीअंतर्गत आदिवासी व्यवहार क्षमता विकास मंच विकसित आणि संचालित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामुळे, आतापर्यंत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित असलेली 'मिशन कर्मयोगी'ची क्षमता-बांधणीची चौकट, आता आदि कर्मयोगी स्वयंसेवक आणि तळागाळात आदिवासी विकास योजना राबवण्यासाठी जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत विस्तारली आहे.
हा उपक्रम आदि कर्मयोगी अभियानाचा एक भाग आहे, ज्याअंतर्गत मंत्रालय 76,000 हून अधिक आदि सेवा केंद्रे आणि 1,54,000 हून अधिक एकेव्हीएस च्या नेटवर्कला सुविधा, नागरिक सहभाग आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत समन्वय साधण्यासाठी शाश्वत गावपातळीवरील व्यासपीठ म्हणून संस्थात्मक स्वरूप देत आहे. पोर्टलवर राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 60,507 एएसके आणि 1,22,072 एकेव्हीची नोंदणी झाली आहे.

एक नाविन्यपूर्ण उपाययोजना: आयजीओटी वरील एका समर्पित एकेव्ही मायक्रोसाइटद्वारे, प्रत्येक स्वयंसेवकाला प्रमाणित, मोबाइल-अनुकूल शैक्षणिक उपकरणे उपलब्ध होतील, जी कधीही, कुठेही वापरता येतील. या उपकरणांमध्ये आदिवासी विकास योजना आणि क्षेत्रातील स्वयंसेवकांच्या भूमिका व जबाबदाऱ्या, तसेच मूल्यमापन आणि प्रमाणपत्राचा समावेश असेल. ही सामग्री केंद्रीय स्तरावर अद्ययावत करून सर्व स्वयंसेवकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवली जाऊ शकते, तसेच राज्यनिहाय शिकण्याच्या प्रगतीचा मागोवा घेतला जाऊ शकतो.
भूमिकांची विभागणी: कर्मयोगी भारत हे प्लॅटफॉर्म होस्ट करेल, चालवेल आणि त्याची देखभाल करेल, शिकाऊ उमेदवारांना सामील करून घेईल, तांत्रिक सहाय्य आणि विश्लेषण प्रदान करेल, आणि प्रगतीचा अहवाल देईल. एमओटीए, डोमेन मालक म्हणून, लक्षित गट आणि क्षमता ओळखेल, सामग्री विकसित करून मंजूर करेल, शिकाऊ उमेदवारांची नावे सुचवेल, आणि प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देईल. एक संयुक्त सुकाणू समिती प्रगतीचा आढावा घेईल आणि अंमलबजावणी-संबंधित समस्यांचे निराकरण करेल.
क्षेत्रीय प्रशिक्षणाशी संलग्न: हे प्लॅटफॉर्म, राज्य आदिवासी कल्याण विभागांच्या भागीदारीत राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था द्वारे तयार आणि वितरित केल्या जाणाऱ्या, एकेव्हीए साठी तीन-दिवसीय प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रमाला पूरक ठरेल. महाराष्ट्र, ओडिशा, गोवा आणि त्रिपुरा या चार प्राधान्य राज्यांमध्ये 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रशिक्षण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर सर्व राज्यांमध्ये 31 डिसेंबर 2026 पर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतची प्रगती: एकेव्ही मायक्रोसाईट कार्यान्वित झाली आहे. 1,25,000 हून अधिक एकेव्ही संस्थांना बल्क एसएमएस द्वारे सूचनात्मक व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत आणि लॉग इन करून अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणी केलेल्या एकेव्ही संस्थांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. राज्य एटीआय साठी अभिमुखता सत्रे पूर्ण झाली असून, नमुना प्रशिक्षण दिनदर्शिका आणि मार्गदर्शन साहित्य संस्थांना वितरित करण्यात आले आहे.
या उपक्रमावर बोलताना, भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव, रंजना चोप्रा म्हणाल्या:
आयजीओटी कर्मयोगीवरील आदि कर्मयोगी मायक्रोसाईट हे आदिवासी भागांमध्ये क्षमता बांधणीची संधी सर्वांसाठी खुली करण्याच्या आणि तळागाळातील नेतृत्व मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. 646 अभ्यासक्रमांसाठी नोंदणी, 235 अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि 112 आदि कर्मयोगी स्वयंसेवकांनी किमान एक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे, हे व्यासपीठ सुरुवातीलाच उत्साहवर्धक प्रतिसाद दाखवत आहे. सामुदायिक स्वयंसेवकांना सरकारी योजना, सेवा वितरण यंत्रणा आणि नागरिक-केंद्रित प्रशासनाचे ज्ञान देऊन, आदि सेवा केंद्रांना आदिवासी सक्षमीकरणासाठी प्रभावी शेवटच्या टप्प्यातील संस्थांमध्ये रूपांतरित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जसजसा सहभाग वाढेल, तसतशी ही मायक्रोसाईट एक कुशल, माहितीपूर्ण आणि प्रतिसाद देणारी स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे विकासाचे फायदे अगदी दुर्गम आदिवासी वस्त्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री होईल.
***
Sonali Kulkarni / Rajesh Shirbhate / Madhura nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323006)
अभ्यागत कक्ष : 6