पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा अग्रसेनजींना वाहिली आदरांजली
Posted On:
11 OCT 2026 10:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराजा अग्रसेनजींच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. महाराजा अग्रसेनजींचे जीवन आणि आदर्श आपल्याला मानवतेच्या मार्गावर निरंतर चालण्याची शिकवण देतात. असे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे महान विचार भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी सदैव प्रेरणा देत राहतील, हे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“जनसेवा आणि सामाजिक सलोख्याचे प्रणेते महाराजा अग्रसेनजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन. त्यांच्या जीवनातून आणि आदर्शांतून आपल्याला सदैव मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. त्यांचे महान विचार भारताच्या सांस्कृतिक उत्थानासाठी सदैव प्रेरणास्रोत राहतील.”
***
नितीन फुल्लुके / श्रद्धा मुखेडकर /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321901)
अभ्यागत कक्ष : 4