पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण; सुशासनाच्या त्यांच्या आदर्शांवर टाकला प्रकाश

Posted On: 11 OCT 2026 9:49AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण केले आहे. त्यांचा प्रभाव विविध पिढ्यांवर राहिला असून, सार्वजनिक जीवन हे राष्ट्र-नविनिर्माणाचे साधन ठरू शकते, असा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला होता, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आणीबाणीच्या काळात लोकनायक जेपी यांनी बुलंद केलेला निर्भय आवाज, तसेच सुशासन आणि समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याबाबतची त्यांची कटिबद्धता, या गोष्टींवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, त्यांच्या आदर्शांची पूर्तता करण्यासाठी देश कटिबद्ध असल्याचे  मोदी यांनी सांगितले.

'एक्स' वरील आपल्या पोस्ट मध्ये मोदी यांनी म्हटले आहे की,

"लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करत आहे. त्यांचा प्रभाव विविध पिढ्यांवर राहिला. सार्वजनिक जीवन हे राष्ट्र-नविनिर्माणाचे साधन ठरू शकते, असा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला. आणीबाणीच्या काळातील त्यांचा निर्भय आवाजही उल्लेखनीय होता.

लोकनायक जेपी यांना सुशासन सुनिश्चित करण्याची आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्याची मनापासून तळमळ होती. 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने काम करत असताना, त्यांच्या आदर्शांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

***

नितीन फुल्लुके / राजेश शिरभाते /परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321888) अभ्यागत कक्ष : 4