पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नाना पाटेकर जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

Posted On: 08 OCT 2026 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

नाना पाटेकरजी यांच्यासारखे भावभावनांचे तीक्ष्ण प्रकटीकरण, व्यक्तिमत्त्व आणि भूमिकेवर उठणारी अमिट छाप फार कमी कलाकारांमध्ये आढळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपले असामान्य अष्टपैलूत्व दर्शवित आणि सर्जनशीलता आणत प्रेक्षकांच्या पिढ्यानपिढ्या स्मरणात राहतील अशी पात्र साकार केली, असे नमूद करून मोदी पुढे म्हणाले की, त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठीही ते तितकेच प्रशंसनीय होते; आपला विश्वास असलेल्या गोष्टी व्यक्त करताना ते कधीही कचरले नाहीत.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांनी दिलेल्या प्रचंड योगदानाचा उल्लेख करत, त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे, पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या ‘एक्स’वर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:

"नाना पाटेकरजी यांच्यासारखे भावभावनांचे तीक्ष्ण प्रकटीकरण, व्यक्तिमत्त्व आणि भूमिकेवरील ठळक छाप फार कमी कलाकारांमध्ये आढळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी प्रत्येक भूमिकेत असामान्य अष्टपैलूत्व दर्शवित आणि सर्जनशीलता आणत प्रेक्षकांच्या पिढ्यानपिढ्या स्मरणात राहतील अशी पात्रे साकार केली, असे नमूद करून मोदी पुढे म्हणाले की, त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठीही ते तितकेच प्रशंसनीय होते; आपला विश्वास असलेल्या गोष्टी व्यक्त करताना ते कधीही कचरले नाहीत.

नाना पाटेकर यांचे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान प्रचंड होते. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.

 

 

नितीन फुल्लुके /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320717) अभ्यागत कक्ष : 9