पंतप्रधान कार्यालय
सरकार प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यूंग यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
Posted On:
07 OCT 2026 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यूंग यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले आणि एप्रिलमधील त्यांच्या भारतभेटीच्या आठवणीला उजाळा दिला. या भेटीमुळे भारत-दक्षिण कोरिया विशेष धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळाली.
दोन्ही देश बहुआयामी सहकार्य अधिक दृढ करतील आणि जागतिक शांतता, स्थैर्य व समृद्धीसाठी एकत्रित कार्यरत राहतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
मोदी यांनी समाज माध्यम X वरील संदेशात म्हटले आहे,
राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यूंग, आपल्या शुभेच्छा संदेशाबद्दल धन्यवाद.
एप्रिलमध्ये आपण भारताला दिलेली भेट माझ्या आठवणीत आहे. या भेटीमुळे आपल्या विशेष धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळाली.
आपण दोन्ही देश मिळून बहुआयामी सहकार्य अधिक दृढ करू आणि जागतिक शांतता, स्थैर्य व समृद्धीसाठीच्या आपल्या समान दृष्टिकोनाला पुढे नेऊ, असा मला विश्वास आहे.
@Jaemyung_Lee
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320593)
अभ्यागत कक्ष : 3