पंतप्रधान कार्यालय
सरकार प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
Posted On:
07 OCT 2026 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच द्विपक्षीय संबंध कायम ठेवण्यासाठी आणि मैत्री अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.
मोदी यांनी समाज माध्यम X वरील संदेशात म्हटले आहे,
राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर, आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
फिलिपिन्ससोबतच्या धोरणात्मक भागीदारीला भारत अत्यंत महत्त्व देतो. दोन्ही देशांमधील सातत्यपूर्ण सहकार्य आणि मैत्री अधिक दृढ करण्यासाठी आगामी काळातही कार्यरत राहण्यास मी उत्सुक आहे.
@bongbongmarcos
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320590)
अभ्यागत कक्ष : 3