पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी अतिशय जिव्हाळ्याने दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार

Posted On: 07 OCT 2026 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

उपराष्ट्रपती थिरु सीपी राधाकृष्णन् यांनी अतिशय जिव्हाळ्याने दिलेल्या शुभेच्छा आणि कौतुकाचे बोल याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.  

लोकसेवेच्या या वाटचालीला भारतातील जनतेच्या विश्वासाने आणि सहभागाने प्रत्येक टप्प्यावर अधिक बळ दिले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांविषयी उपराष्ट्रपतींनी केलेले निरीक्षण अत्यंत प्रोत्साहनदायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

'विकसित भारत' चे आपले सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी आपण आणखी जास्त ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले:

"थिरू सी. पी. राधाकृष्णन जी, आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि केलेल्या कौतुकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

लोकसेवेचा हा प्रवास भारतातील जनतेच्या विश्वासाने आणि सहभागाने प्रत्येक टप्प्यावर अधिक मजबूत झाला आहे.

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांविषयी आपण केलेले निरीक्षण अत्यंत उत्साहवर्धक आहे.

आपले विकसित भारताचे सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी मी आणखी नव्या ऊर्जेने कार्य करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. @VPIndia"


माधुरी पांगे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2320434) अभ्यागत कक्ष : 12